शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

‘गुडविन’विरोधात ठाणे जिल्ह्यात आणखी गुन्हे; नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 01:22 IST

सत्तर जणांना एक कोटी ६७ लाखांना गंडविले

ठाणे : गुंतवणुकीवर जादा व्याजाचे तसेच सोन्याचा दागिना देण्याचे प्रलोभन दाखवून ठाणे शहर आणि परिसरातील ७० ते ८० जणांची एक कोटी ६७ लाख ५३ हजार ६६० रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुनीलकुमार अकराकरण या ‘गुडविन’च्या व्यवस्थापकीय संचालकांसह पाच जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. आतापर्यंत त्यांनी ७० जणांची फसवणूक केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच नालासोपारा, अंबरनाथमध्येही गुन्हे दाखल झाले आहेत.

ठाण्यातील पूजा शेलार (३१, रा. समतानगर, वर्तकनगर) यांनी याप्रकरणी २८ आॅक्टोबरला नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नौपाड्यातील गुडविन ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक मोहनन, पूर्णवेळ संचालक सुधीरकुमार अकराकरण, सचिव सचिन चौधरी, व्यवस्थापक सुब्रमण्यम मेनन व व्यवस्थापक प्रदीप यांनी शेलार व अन्य ग्राहकांना आॅगस्ट २०१७ ते २८ आॅक्टोबर २०१९ दरम्यान विविध योजना, भिशी व ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे प्रलोभन दाखवले. त्याला भुलून शेलार व त्यांच्या आई नीलिमा यांनी १० हजार रुपये प्रति महिना, असे दोघींचेही २४ महिन्यांमध्ये चार लाख ८० हजार रुपये जमा केले. मात्र, या ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर शेलार व नीलिमासह इतर ६८ गुंतवणूकदारांनी त्यांची रक्कम किंवा सोन्याची वस्तू देण्याचा तगादा लावला. परंतु, हे दागिने किंवा पैसे परत न करता एक कोटी ६७ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या सुनिलकुमारसह पाच जणांविरुद्ध २८ आॅक्टोबरला नौपाडा पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मनोहर सोनवणे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

अंबरनाथमध्येही ४८ जणांनी केली तक्रार : दोन कोटी ४७ लाखांना गंडागुडविन ज्वेलर्सने अंबरनाथकरांचीही फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्या ४८ नागरिकांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत तक्र ार दाखल केली आहे. त्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी गुडविनचा मालक आणि व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ४८ नागरिकांच्या फसवणुकीचा आकडा तब्बल दोन कोटी ४७ लाखाच्या घरात आहे. अंबरनाथ पूर्वेकडे पनवेलकर प्लाझा येथे गुडविनने आपला व्यवसाय थाटला होता. १६ टक्के व्याजाच्या आमिशाला बळी पडून अनेक ग्राहकांनी या ठिकाणी गुंतवणूक केली होती. सोबत अनेक ग्राहकांनी भिशीही लावली होती. आकर्षक व्याजाला बळी पडून अंबरनाथमधील ४०० ते ५०० नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र त्यातील ४८ गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. या तक्र रीवरून सुनीलकुमार अकरकारण, सुधीरकुमार अकरकारण आणि व्यवस्थापक वेणुगोपालन यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हे सर्वजण दुकान बंद करून फरार झाले आहेत. या प्रकरानंतर दुकान सील करण्यात आले आहे. फरार झालेल्यांचा तपास सुरु असल्याचे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनजितसिंग बग्गा यांनी सांगितले.पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे याच्या माहितीनुसार, गुडविन ज्वेलर्सचे मॅनेजर भालानंदन आणि मालक यांनी मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्या स्कीममध्ये अनेक ग्राहकांना पैसे भरण्यास सांगितले. मात्र, पैसे गुंतवल्यानंतरही ते परत न केल्याचे बºहामपूर येथील कर्मा अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/१०१ मध्ये राहणाºया सुनीता श्रीरामदार (५२) यांनी सांगितले. त्यांची मुलगी मधुरा आशिष संगावार हिने देखील ३ लाखांची गुंतवणूक केली आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी ज्वेलर्सच्या दुकानासमोर मोठी गर्दी केल्याने तेथे पोलिसांचा बंदोबस्त आहे.

टॅग्स :Policeपोलिस