शॉक लागून माकडाचा मृत्यू; वागळे इस्टेटमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 11:25 PM2021-07-23T23:25:45+5:302021-07-23T23:26:03+5:30

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Monkey dies after electric shock; Incident at Wagle Estate, thane | शॉक लागून माकडाचा मृत्यू; वागळे इस्टेटमधील घटना

शॉक लागून माकडाचा मृत्यू; वागळे इस्टेटमधील घटना

Next

ठाणे : येथील वागळे इस्टेट, रामनगरमधील हनुमान मंदिराजवळच शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका माकडाला महावितरणच्या इलेक्ट्रीक वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत माकडाला इलेक्ट्रीक वायरवरून खाली काढून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

Web Title: Monkey dies after electric shock; Incident at Wagle Estate, thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Monkeyमाकड