शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्डसाठी रखडलेल्यांना मानधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 03:35 IST

अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते.

- सुरेश लोखंडेठाणे - अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. परंतु, दिवाळीच्या मुहूर्तावर हा विषय गांभीर्याने घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने ते जुन्या पद्धतीने काढण्याचे आदेश १ नोव्हेंबरला जारी केले. यामुळे राज्यभरातील सेविकांना दिलासा मिळून त्यांची दिवाळी गोड झाली आहे.राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे या विभागांमध्ये एक लाख ९७ हजार ९६ अंगणवाडीसेविका कार्यरत आहेत. यापैकी एक लाख ९२ हजार ७६० सेविकांचे मानधन आता ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, उर्वरित चार हजार ३३६ अंगणवाडीसेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडीसेविका यांनी त्यांचा आधारकार्ड क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न केला नाही. यामुळे त्यांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते.मात्र, ऐन दिवाळीत त्यांना मानधनापासून वंचित ठेवणे योग्य नसल्याची जाणीव होताच शासनाने हे आदेश जारी केले. परंतु, यानंतरचे मानधन मात्र ‘पीएफएमबी’ या संगणकीय प्रणालीद्वारे बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनादेखील जबाबदारीने संबंधित सेविकांकडून आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.पीएफएमबी प्रणालीमध्ये खातेजोडणी‘पीएफएमबी’ प्रणालीत खातेजोडणी करण्यासाठी अंगणवाडीसेविका सहकार्य करत नसतील, तर संबंधित अधिकाºयांबरोबर अंगणवाडी सेविकांवर देखील जबाबदारी निश्चित करून त्यांच्याविरु द्ध कारवाई करण्यात येईल, असे बजावण्यात आल्याने संबंधितांनी तातडीने बँक खात्याशी आधारकार्ड संलग्न करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राजेश सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारthaneठाणेVasai Virarवसई विरार