माणगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने त्याच्याचसोबत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर गेले अनेक दिवस नजर ठेवत, तिचा विनयभंग केला. या प्रकरणी तक्रार २२ मार्च रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी विद्यार्थी (रा. चिपळूण) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संबंधित तरुणास गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तपास पो. नि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
विनयभंग करणाऱ्यास अटक
By admin | Updated: March 24, 2017 01:15 IST