शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात विवाहितेचा घरापर्यंत पाठलाग करुन विनयभंग: प्रतिकारानंतर आरोपीचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 20:07 IST

ठाण्याच्या पााचपाखाडीमध्ये राहणा-या एका विवाहितेचा पाठलाग करुन थेट घरात शिरुन विनयभंग करुन एका माथेफिरुने पलायन केल्याची घटना रविवारी घडली.

ठळक मुद्देपूर्वीची ओळख सांगून घरात शिरकावमहिलेने प्रतिकार करुन घेतला चावानौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे: जुजबी जुनी ओळख काढून पाचपाखाडीतील एका चाळीत शिरुन एका २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग करणा-या रॉबर्ट मढवी याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेने त्याला प्रतिकार करतांनाच त्याच्या हाताला जोरदार चावा घेतल्याने त्याने पलायन केले असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.पाचपाखाडीतील एका चाळीत राहणारी ही विवाहिता वीजेचे बिल भरण्यासाठी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी यशवंत टॉवर येथे जात असतांना त्यांच्याशी जुजबी ओळख असलेला रॉबर्ट मढवी याने त्यांचा चोरुन पाठलाग केला. नंतर त्याने त्यांना जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यांनी दुर्लक्ष केल्यानंतर त्याने पुन्हा ४ मार्च २०१८ रोजी एका महिलेसोबत त्यांच्या घरी येऊन त्याची ओळख सांगितली. त्यानंतर तो निघून गेला. अर्ध्या तासाने त्या महिलेचा पती बाहेर गेल्यानंतर मात्र त्याने पुन्हा त्यांच्या घरात शिरकाव करुन तिचे तोंड दाबून तिचा विनयभंग केला. अचानक झालेल्या या प्रकाराला तिने त्याला प्रतिकार करीत त्याच्या हाताला जोरदार चावा घेऊन त्याला ढकलून दिले. त्यानंतर मत्र त्याने तिथून पलायन केले. याप्रकरणी तिने नौपाडा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. राबोडी परिसरात राहणारा रॉबर्टला गांजाचे व्यसन असून त्याने यापूर्वीही दोन तीन वेळा अशाच प्रकारे विवाहित महिलांचा विनयभंग केला आहे. मात्र भीतीपोटी कोणीही तक्रारीसाठी पुढे आले नाही. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMolestationविनयभंगCrimeगुन्हा