शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत.

बदलापूर  -आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. भविष्यात नागपूरच्या रेशीमबागेचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण झाल्यानेच संघाने आपल्या मतांमध्ये बदल केल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.बदलापूरमधील संवेग फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ कवी राजीव जोशी लिखित ‘कापूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केतकर बदलापुरात आले होते. यावेळी केतकर यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुस्लिमांबाबत सरसंघचालकांची बदललेली मते ही मोदींमुळे बदलली असून येत्या निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी धोकादायक ठरणारा असेल, अशी भीती संघाला वाटत आहे. मोदींनंतर भाजपाचे काय होईल, मोदींनंतर संघालाही महत्त्व नसले, तर संघाचे काय होईल, अशी भीतीही संघाला वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्यासाठी सरसंघचालक अशी वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ही त्यांची धोरणात्मक आणि ढोंगात्मक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येत्या निवडणुकीत मोदींना काँग्रेसपेक्षा भाजपामधूनच मोठा विरोध होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. केतकर यांनी मोदींच्या परदेशवारीवरही टीका केली. इतक्या दौऱ्यांनंतर काय साध्य केले, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. दौºयांमुळे ना देशात परदेशी गुंतवणूक आली ना जागतिक संघटनांचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे दौरे कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोरांना परदेशात असलेल्या महत्त्वामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांना नेहरू-टागोरांची जागा मिळवायची आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे महत्त्व मिळत नसल्यानेच दौरे वाढत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनंजय गांगल, संदीप काळे, ग्रंथसखाचे श्याम जोशी, श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ