शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल टॉवरचा महापालिका करणार सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 05:08 IST

सदस्यांची महासभेत मागणी : प्रशासनाने घेतला निर्णय

ठाणे : शहरात कोणकोणत्या ठिकाणी मोबाइल टॉवर आहेत, याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने गुरुवारी घेतला. शैक्षणिक संस्था, हॉस्पिटलपासून ते किती अंतरावर आहेत, याची माहिती यातून समजणार आहे. ते नियमाप्रमाणे आहेत की नाहीत, याची तपासणीदेखील केली जाणार असून यासंदर्भातील अहवाल सादर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी सभागृहात केली.

ठाण्याच्या विविध भागांत एक हजार टॉवर उभे आहेत. परंतु, ठाणे महापालिकेकडे ते कोणत्या ठिकाणी बसवले आहेत याची आणि त्यापैकी प्रत्येक टॉवरमधून किती प्रमाणात रेडिएशन बाहेर पडते, याची माहिती नाही. बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा मुद्दा उपस्थित झाला होता. मायक्र ो सेल टॉवर विद्युतपोलवर बसवण्याच्या प्रस्तावावरून सभागृहात असलेल्या या टॉवरविषयी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सखोल चर्चा करण्यात आली. टॉवर कोणत्या ठिकाणी उभारावे, याचे निश्चित धोरण महापालिकेकडे नसल्यानेच नको त्या ठिकाणी ते उभारल्याची माहिती लोकप्रतिनिधींनी सभागृहात उघड केली. दिवा भागातील नगरसेवक बालाजी पाटील यांनी दिवा येथील अर्धवट असलेल्या रस्त्यावर मोबाइल टॉवर उभारला असून तो काढण्याचे साधे कष्टदेखील प्रशासनाने घेतले नसल्याचे सभागृहात सांगितले.काही मोबाइल टॉवर तर डीपी रस्त्यामध्ये तसेच शैक्षणिक संस्थांजवळ बसवल्याचा मुद्दादेखील यावेळी उपस्थित करण्यात आला. यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून महापालिकादेखील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप सभागृहात करण्यात आला. मुंब्रा परिसरात उभारलेले टॉवर हे एक तर अनधिकृत इमारतींवर किंवा धोकादायक इमारतींवर उभारले असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा मुद्दा नगरसेविका अशरीन राऊत यांनी उपस्थित केला. मात्र, यावरदेखील प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही.सर्व्हे योग्य पद्धतीने करण्याची आवश्यकताविरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी शहरात असलेल्या मोबाइल टॉवरचा योग्य पद्धतीने सर्व्हे करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शहरात आणखी नवीन टॉवर येण्याआधी तो होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या चर्चेनंतर शहरातील सर्व टॉवरचा लवकरच सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे