शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कर थकवल्याने मोबाइल गॅलरीला सील, ठामपाची कारवाई, मालमत्ता केली जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:14 IST

स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली.

ठाणे : स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली.ठाणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीने २०१३-१४ पासून स्थानिक संस्थाकरापोटी असलेली १२.५५ कोटींची रक्कम भरली नव्हती. यासंदर्भात कंपनीला वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. परंतु, रक्कम न भरता या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कोणतेही अंतरिम आदेश न दिल्याने महापालिकेने बुधवारी नौपाडा भागातील त्यांची गॅलरी सील केली. तसेच गॅलरीची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.दरम्यान, स्थानिक संस्थाकरासाठी नोंदणीकृत असलेल्या आस्थापनांपैकी ज्या आस्थापनांनी २०१३-१४ पासून त्यांची विवरणपत्रे दाखल केली नसतील किंवा त्यांनी विवरणपत्रे दाखल करून आवश्यक असलेली कागदपत्रे सादर केली नसतील, अशा आस्थापनांनी विवरणपत्रे व करनिर्धारणेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करावीत आणि पुढील कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.ठामपाकडून दबावठाणे महानगरपालिकेने एअरटेलकडून स्थानिक संस्थाकरसारख्या काही विशिष्ट मागण्या केल्या आहेत. या मागण्यांविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले असून हे प्रकरण प्रलंबित आहे. तथापि, एअरटेलवर दबाव टाकून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महानगरपालिकेने आमच्या अनेक स्टोअरपैकी एक स्टोअर बेकायदेशीरपणे सीलबंद केले असल्याचा आरोप एअरटेलच्या अधिकृत निवेदनामध्ये केला आहे. आम्ही या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयाकडे निवाडा मागितला आहे. उच्च न्यायालय आमचे स्टोअर डी-सील करण्याचा आदेश महापालिकेला देईल, असा विश्वास या निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका