शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:50 IST

मुंब्रा स्टेशनवरील लोकल रेल्वे अपघतात मनसे कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याची माहित अविनाश जाधव यांनी दिली

Mumbai Local Train Accident: मुंबई मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन फास्ट लोकल ट्रेनमधून पडून भीषण अपघाताची घटना घडली. सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन्ही लोकलमधील फुटबोर्डवरुन प्रवास करणारे प्रवासी एकमेकांना धडकले आणि रेल्वे ट्रॅकवर पडले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारा मनसे कार्यकर्ताही या अपघातात जखमी झाला आहे. त्यामुळेच, या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. 

सोमवारी सकाळी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान फास्ट लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले प्रवासी हे कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन्ही लोकलमधील होते. ट्रेनमध्ये फुटबोर्डवर लटकून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या बॅग खाली पडल्यानंतर बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांची त्यांना धडक बसली आणि ते खाली पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र प्रवासी दरवाज्यात लटकल्याची अफवा असल्याचे मनसे पदाधिकाऱ्याने म्हटलं. कुणाल नावाच्या मनसे पदाधिकाऱ्याने मुंब्रा स्थानकावर असलेल्या धोकादायक सिग्नल आणि वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले होते. कुणाल यांच्यासोबत त्यांच्या दोन मित्रांनीही यासाठी पत्रव्यवहार करत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र ते दोघेही या अपघातात जखमी झाले आहेत.

"कळवा रुग्णालयात जेव्हा प्रवाशांना आणलं तेव्हा मी सुरुवातीपासून इथे होतो. त्यांना प्रचंड मार लागला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. रोज एक ते दोन प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो. त्याबाबतीत आम्ही सतत प्रशासनासोबत बोलत आहोत. प्रशासनासोबत पत्र व्यवहार करत आहोत. आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणाल नावाच्या महाराष्ट्र सैनिकाने तीन महिन्यांपूर्वी रेल्वेची पत्रव्यवहार केला होता. त्याच्यासोबतच्या महाराष्ट्र सैनिकांनी तीन महिन्यांपूर्वी रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल आणि  वळणावर मोठी घटना होऊ शकते यासंदर्भात पत्र दिले होतं. याबाबतीत काम करायला हवं असं या पत्रात म्हटलं होतं. या कामासाठी जी दोन-तीन मुलं पाठपुरावा करत होती त्यातील एकाचे या दुर्घटनेत पाय गेले आहेत. जो मुलगा हे सगळं घडू शकतं असं सांगत होता त्याचेच या अपघातात पाय गेले आहेत," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान या रेल्वे अपघातात राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा), केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर), मयूर शाह (वय ५० ), विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी) यांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातmumbraमुंब्राMumbai Localमुंबई लोकलthaneठाणेMNSमनसे