शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजभाषा मराठीचा अवमान केल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:43 IST

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर  कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . पालिका आयुक्तांना निवेदन देतानाच  यापुढे पालिकेकडून राजभाषेचा अवमान झाल्यास तो राजद्रोह समजून तुमचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा देखील मनसेने दिला ...

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर  कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . पालिका आयुक्तांना निवेदन देतानाच  यापुढे पालिकेकडून राजभाषेचा अवमान झाल्यास तो राजद्रोह समजून तुमचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा देखील मनसेने दिला आहे . 

महापालिकेत महापौर यांच्या सह अनेक नगरसेवकांना मराठी येत नसल्याचा मुद्दा मराठी एकीकरण समितीने उपस्थित करत आंदोलन केले होते . पालिकेचा कारभार मराठीतून चालत नसल्या बद्दल तक्रारी करत समितीने थेट भाजपा प्रदेश नेत्यांना देखील निवेदन देत मराठी महापौर द्या अशी मागणी चालवली होती . 

वास्तविक मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून शासनाने देखील मराठीचा वापर कामकाजात करण्या बद्दल वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. तसे असताना महासभेत तसेच अन्य समित्यांच्या बैठकीत सर्रास महापौरांपासून अनेक नगरसेवक मराठी ऐवजी अन्य भाषेचा वापर करतात . काही नगरसेवक तर मराठी येत असताना देखील अन्य भाषेत बोलतात . 

पालिका प्रशासन देखील आपल्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला डावलत आहे.  आरोग्यविभागाकडून छापण्यात आलेली पत्रके असो किंवा पालिका क्रीडा संकुलात लावण्यात आलेले फलक व जाहिरात पत्रके असो. ती देखील मराठी ऐवजी इंग्रजी, हिंदी भाषेत आहेत. नागरिकांना माहिती देण्यासाठी पालिकेच्या कर विभाग, पाणी पुरवठा विभाग आदींची वाहने शहरात आवाहन करताना व माहिती देताना फिरतात. पण पालिकेचे जाहीर आवाहन देखील गुजराती, हिंदी भाषेत केले जाते .

नुकत्याच झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात देखील चक्क हिंदी भाषेत स्वागताचे प्रवेशद्वार  लावले होते. व्यासपीठावर देखील महिला दिन हे इंग्रजी भाषेत लिहले होते. कार्यक्रमात तर पूर्णपणे मराठीचा वापरच केला जात नाही. आमदार, नगरसेवक देखील हिंदीचा सर्रास वापर करतात . 

राजभाषा  मराठीची सातत्याने गळचेपी महापालिकेत केली जात असून या मागे केवळ मराठी बद्दलचा द्वेष व राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप  मनसे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केलाय . राजभाषा मराठीचा अवमान म्हणजे राजद्रोह असून मराठीचा अवमान करणारे तसेच शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पालिका अधिकारी - कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करण्यात आली . 

मनसे  शिष्ट मंडळाने आयुक्त  बी. जी पवार यांना भेटून निवेदन दिले.  आयुक्तांनी चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे .  या वेळी  नरेंद्र पाटोळे , हेमंत सावंत , शशी मेंडन ,  सचिन पोफळे , प्रमोद देठे , रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते . राजभाषा मराठीचा पालिकेच्या सर्व कामकाज, कार्यक्रम आदीं मध्ये शंभर टक्के वापर झाला पाहिजे . पण पालिके कडूनच राजभाषेचा अवमान होण्याचे प्रकार गंभीर आहेत. या पुढे पालिकेकडून मराठीचा अवमानका  वा मुद्दाम गळचेपी केल्यास पालिकेचे कार्यक्रम उधळून लावू असा असा इशारा देखील मनसेने दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर