शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेवर मनसेचा आज शेतकरी मोर्चा; मोठ्या संख्येने या... राज ठाकरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 00:47 IST

मनसेच्या वतीने १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले.

ठाणे : मनसेच्या वतीने १७ मे रोजी ठाणे महापालिकेवर निघणाऱ्या शेतकऱ्यांच्या महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे गुरुवारी केले. केवळ ठाणे नव्हेच राज्यातील सर्व शहरांमध्ये शेतकºयांसाठी केवळ जागाच नव्हे, तर इतरही सुविधा मिळवून देण्यासाठी मनसे प्रशासनाला भाग पाडणार आहे. बाकी प्रश्नांवर राज्यस्तरावर जे काही करायचे, ते करीनच. तूर्तास याविरुद्ध आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे, असे राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याने ठाणे शहरात चक्काजाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.ठामपाने भाजपाच्या तक्रारीवरून आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकºयांची सध्याची अवस्था जर सरकारचा एक घटक असणाºया लोकप्रतिनिधींना समजत नसेल, तर त्यांना ताळ्यावर आणणे गरजेचे आहे. केवळ एक शेतकरी आहे म्हणून ही घटना दुर्लक्ष करणे योग्य नाही, तर ही एक प्रातिनिधिक घटना आहे, असे समजून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे, म्हणूनच शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा निघत आहे.भाजपाकडून गुंडांचा वापरशेतकºयांनी एकट्याने असो वा सामूहिकपणे त्याने उत्पादित केलेला माल विकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे.त्यासाठी शहरातील सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जागा मिळवून दिली पाहिजे, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.शेतकरी बाजारपेठांना मनसेचे कार्यकर्ते सर्वतोपरी मदत करत असताना केवळ श्रेय मिळू नये, यासाठी भाजपाचे पदाधिकारी हे गुंडांकडून अशावेळी प्रशासनावर दबाव आणून शेतकºयांना हुसकावून लावण्याचे प्रयत्न करतात, असा आरोप राज ठाकरे यांनी या पत्रात केला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणे