शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

'उत्तर' सभा संध्याकाळी पण राज ठाकरे दुपारीच लावणार ठाण्यात हजेरी!, स्वागतासाठी १ हजार दुचाकीस्वार सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 08:19 IST

राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.

राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. सायंकाळची होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. यावेळी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात ते मनसे पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहेत. ते दुपारीच येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी सज्ज केलेल्या चारचाकी आणि दुचाकीस्वारांची तयारी दुपारीच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शहर अध्यक्ष रवी मोरे यांनी दिली.

राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी हजार दुचाकीस्वारप्रदीर्घ कालावधीनंतर ठाण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. मंगळवारी होणाऱ्या  उत्तरसभेत ते काय बोलणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे. परंतु, त्यासाठी शहर मनसेने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. त्यासाठी हातात भगवे झेंडे घेऊन तब्बल २०० चारचाकी आणि एक हजार दुचाकीस्वारांच्या रॅली ठाण्याच्या वेशीवरून थेट सभास्थळापर्यंत आणण्यात येणार आहे. एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीचे रणशिंग या सभेच्या निमित्ताने फुंकले जाणार असल्याचे दिसत आहे.  

वसंत मोरे म्हणतात शंभर टक्के समाधानी, मनसेतच राहणारमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारे मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सोमवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आपण १०० टक्के समाधानी असून आपण पक्षातच राहणार असल्याचे मोरे म्हणाले. भूमिका मांडण्यापूर्वी संपर्क का साधला नाही, असा प्रश्न करत पक्षनेतृत्वाने मोरे यांना बैठकीत सुनावल्याचे समजते. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे राज ठाकरे मंगळवारी ठाण्यात होणाऱ्या सभेत देतील, अशी माहितीही त्यांनी दिली. भेटीनंतर मोरे म्हणाले की, माझ्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. मला मंगळवारच्या ठाण्यातील सभेसाठी बोलविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे