शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सुधाकर चव्हाणांना मनसेचा ‘राज’मार्ग खुला?

By जितेंद्र कालेकर | Updated: October 7, 2018 23:30 IST

आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते.

ठळक मुद्देतीन वर्षांनंतर प्रथमच एका कार्यक्रमात एकत्रनिमित्त नेत्रालयाच्या उद्घाटनाचेमनसेकडून आॅफर असल्याची चर्चा

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महाराष्टÑ नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे एकेकाळचे ठाण्यातील सर्वेसर्वा, माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण ठाण्यातील व्यासपीठावर तब्बल तीन वर्षांनंतर प्रथमच एकत्र आले. अर्थात, चव्हाण यांना मनसेकडून ‘आॅफर’ असल्याची चर्चा यावेळी उपस्थितांमध्ये रंगली होती. मात्र, आपण मनसेच काय, कोणत्याही पक्षामध्ये जाऊ शकतो, केवळ ‘स्थळ’(अर्थात बोलावणे) येण्याची वाट पाहत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.ठाणे महापालिकेत एकेकाळी अपक्ष नगरसेवकांची एकहाती मोट निवडून आणणारे ‘भाई’ म्हणून चव्हाण यांच्याकडे पाहिले जात होते. पुढे त्यांनी मनसेतून स्वत:सह पुतणी तेजश्री चव्हाण तसेच राजश्री नाईक, ऋचिता मोरे, शैलेश पाटील असे सात नगरसेवक २०१४ मध्ये निवडून आणले होते. २०१५ मध्ये स्थायी समिती निवडणुकीच्यावेळी अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांनी सदस्यपदासाठी शैलेश पाटील यांचे नाव सूचित केले होते. त्यानुसार, राज ठाकरे यांनीही या नावाला पसंती दर्शवली होती. परंतु, चव्हाण यांनी मात्र सात जणांच्या चिठ्ठीतून राजश्री नाईक यांचे नाव दिले होते. त्यामुळे पक्षशिस्त न पाळल्याने चव्हाण यांची त्यावेळी पक्षातून हकालपट्टी झाली. त्यामुळे सुधाकर चव्हाण, तेजश्री चव्हाण आणि राजश्री नाईक पक्षातून बाहेर पडले. ऋचिता मोरे, शैलेश पाटील हे शिवसेनेत गेले. त्यावेळी एकमेव पक्षात राहिलेल्या रत्नप्रभा पाटील यांनीही भाजपाची वाट धरली. २०१७ मध्ये राजश्री नाईक यांनी पुन्हा मनसेतूनच ठामपाची निवडणूक लढवली. त्या पराभूत झाल्या. २०१५ मध्येच एका बिल्डरच्या आत्महत्या प्रकरणात सुधाकर चव्हाण यांना अटक झाली. दरम्यान, सुधाकर चव्हाण यांनी अपक्ष म्हणून २०१७ मध्ये पालिकेची निवडणूक लढवली. पण, ते पराभूत झाले. आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते. त्यातूनच मध्यंतरी एका पदाधिकाऱ्याने तसे बोलूनही दाखवले होते. रविवारी ठाण्यात एका नेत्रालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तीन वर्षांनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि सुधाकर चव्हाण हे एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले. योगायोगाने ‘राज’कारणात नेत्यांमध्ये दूददृष्टीचा अभाव असल्याची खंतही राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली. हा इशारा कोणाकडे होता, यावरूनही अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.-----------------------‘‘आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ बोलावणे येण्याची वाट पाहतोय. योग्य वाटले तर होकार देऊ. पण, एखाद्या कार्यक्रमाला आलो म्हणजे लगेच मनसेमध्ये चाललो, असे होत नाही.’’सुधाकर चव्हाण, माजी गटनेते, मनसे, ठामपा

टॅग्स :thaneठाणेPoliticsराजकारणMNSमनसे