शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ पालिकेवर मनसेने दिली धडक; फेरीवाले हटवण्यासाठी दिला अल्टिमेटम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 10:18 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर  अंतरावर फेरीवाले बसू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : येत्या १५ दिवसांत अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाल्यांपासून मुक्त करावा; अन्यथा  १६ वा  दिवस  महाराष्ट्र  नवनिर्माण सेनेचा असेल. कायदा हाती घेऊन फेरीवाल्यांपासून स्टेशन परिसर मुक्त करून दाखवेल, असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिला. संधी द्या, एका तासात फेरीवाले हटवून दाखवतो, अशा शब्दात  प्रशासनाला  यावेळी ठणकावले. 

शहरातील रखडलेली विकासकामे, सार्वजनिक स्वच्छता, अनधिकृत बांधकामे, पार्किंगची समस्या, प्रशासनाचा नागरिकांशी तुटलेला संवाद, यांसारख्या नागरिकांना  जाणवणाऱ्या समस्यांच्या संदर्भात गुरुवारी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयावर मनसेच्या वतीने मोर्चा  काढण्यात आला होता. जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी समस्यांबाबत चर्चा केली. 

जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या नेतृत्वाखाली वडवली विभागातून मोर्चा निघाला. जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष  कुणाल भोईर,  संघटक संदीप लकडे, स्वप्निल बागुल, अविनाश सुरसे, धनंजय गुरव, माजी नगरसेविका अपर्णा भोईर, सुप्रिया देसाई उपस्थित होते. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर  अंतरावर फेरीवाले बसू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत चार दिवसांची मुदत मनसेच्या वतीने मागण्यात आली. मात्र, नियोजन करण्यास वेळ द्यावा, असे पोलिस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्यानंतर १५ दिवसांची मुदत देण्यात आली. कारवाई करताना मनसे पदाधिकाऱ्यांना अटक केली तरी अंबरनाथबाहेरील पदाधिकारी मागवून आंदोलन केले जाईल, असेही जिल्हाध्यक्ष जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांना  सांगितले. 

टॅग्स :MNSमनसे