शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "या हातानं पाप केलं नाही, तर त्या नोटीसी कोणत्याही असो मी भीक घालत नाही;" राज ठाकरे कडाडले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 20:02 IST

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही : राज ठाकरे

"अनेक पक्षाच्या नेत्यांचे जे अकलेचे तारे तोडले, त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पत्रकार परिषदेत मला हे उत्तर द्यायचं नव्हतं. मला विषय भरकटवून द्यायचा नव्हता. म्हणून मी अविनाश जाधव यांना ठाण्यात सभेबद्दल विचारलं. काही ठिकाणी वीज नाहीये म्हणून ही सभा दाखवत नाहीयेत असं एकानं सांगितलं. पण आजकाल हे मोबाईलवरही दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षाच नाही. जम्मूमध्येही ही सभा दाखवली जातेय. अनेक राज्यात ही सभा दाखवली जातेय," असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी ठाण्यात आयोजित उत्तर सभेत अनेक विषयांवर भाष्य केलं.

MNS Raj Thackeray Uttar Sabha Live : "गेल्या निवडणुकीच्या वेळी बहुमत शिवसेना भाजपकडे आल्यावर मतदारांची प्रतारणा केली. पहाटेचा एक शपथविधी झाला, मग तो फिस्कटला. या दोन्हीवर बोलल्यावर ही भाजपची स्क्रिप्ट कुठून आली. हे जे विसरले होते ती मी आठवण करून दिली. जेव्हा मी मोदींवर बोललो तेव्हा मला त्या भूमिका मला नाही पटल्या. उघडपणे बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला असं म्हणतात. मला ट्रॅक बदलायला लागत नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं."माहिती करून घ्यायची नाही, आयएल अँड एफएस नावाची कंपनी होती, मी त्यात होतो. नंतर ते झेपायचं नाही म्हणून एका वर्षात त्यातून  बाहेर पडलो. त्या कंपनीच्यासाठीची नोटीस होती. ती नोटीस आल्यावर मी ईडीच्या कार्यालयात गेलो. शरद पवारांना येतेय म्हणून चाहूल लागली तर यावर एवढं नाटक केलं. हातानं जर पाप केलं नाही तर नोटीसी राजकीय असू दे की कायदेशीर मी भीक नाही घालत त्याला," असंही ते म्हणाले. उद्या मला एखादी गोष्ट नाही पटली, तर परत विरोध करेन. पण उगाच विनाकारण भाषणाला उभे राहिलेत, टीका करा असं नाही करणार. आता तुम्ही शेण खाल्लंय, आता तुमच्यावर टीका करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणेNarendra Modiनरेंद्र मोदी