शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण-डोंबिवली दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 11:48 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी सकाळी राज ठाकरे डोंबिवली दाखल झाले आहेत.

डोंबिवली- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर असून शुक्रवारी सकाळी राज ठाकरे डोंबिवली दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांची डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली मनसेचे गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या अंतर्गत बैठक सुरु आहे. सभागृहात अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला प्रवेश देण्यात आलेला नाही तसंच पोलिसांनाही बाहेर जाण्यास सांगण्यात आलं आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर संध्याकाळी पाच वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

शनिवारी राज ठाकरे कल्याणमध्ये असून तेथील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत . मुंबई महापालिकेत घडलेल्या मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नऊ नगरसेवक आहेत. त्यात सुनंदा कोट या नगरसेविकेने पक्षाला अंधारात ठेवून शिवसेनेच्या सहकार्याने प्रभाग अध्यक्ष पद पटकाविले आहे. यावर ठाकरे काही भाष्य अथवा निर्णय देतात का याकडेही लक्ष लागले आहे.

राज ठाकरे हे गुरुवारी संध्याकाळी डोंबिवलीत येणार होते पण सायन दादर येथील वाहतूककोंडीत अडकल्याने ते माघारी परतले होते. पण आता शुक्रवारी सकाळीच ते डोंबिवलीत दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवली