शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची लोकसभा निवडणुकीची भूमिका ९ मार्च रोजी ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:44 IST

येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत. त्याच दिवशी ठाण्यातून ही निवडणूक कोणता उमेदवार लढणार हेदेखील स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्या या निवडणुकीसाठी मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे या चार जणांची नावे चर्चेत आहे. मात्र, पक्ष याबाबत कोणता निर्णय घेईल, याची मनसैनिकांमध्ये उत्सुकता आहे.लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. प्रत्येक पक्ष आपल्या परीने तयारीला लागला आहे. यंदाची निवडणूक अटीतटीची होणार आहे. यापूर्वी राज यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार? आघाडीसोबत जाणार की ती लढविणारच नाही? याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट न झाल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.एकीकडे पक्षाच्या भूमिकेबाबत मनसैनिकांत गोंधळाचे वातावरण असले तरी दुसरीकडे याच मनसैनिकांमधून चार नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढविणार असल्याचे जाहीर केल्यास तीसाठी ठाणे लोकसभा मतदार संघातून पानसे हेच आमचे उमेदवार असतील अशी भूमिका जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केली आहे. तर त्यांच्या या भूमिकेला काळे यांनीदेखील दुजोरा दिला आहे. या आधी ही निवडणूक लढविणाऱ्यांनीच ती लढवावी असे मत त्यांनी लोकमतशी बोलताना नोंदविले. दुसरीकडे जाधव यांच्या चाहत्यांनी ही निवडणूक त्यांनीच लढवावी असा जोर धरला आहे. परंतु, निवडणुकीत उतरण्याची त्यांनी तयारी दाखवलेली नाही.काळे यांच्याबरोबर पक्षस्थापनेपासून पक्षात कार्यरत असणाऱ्या पाचंगे यांचे नावही मनसैनिकांच्या मुखी आहे. त्यामुळे कोणता चेहरा समोर येईल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. २०१७ च्या ठाणे महापालिका निवडणुकीत पक्षाला शुन्यावर यावे लागल्याने पक्षाने विविध आंदोलने हाती घेऊन पक्षाला नवी उभारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत उतरल्यावर मनसे आपली किती ताकद लावते, याबाबत ठाणेकरांमध्ये चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरे