शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

By प्रशांत माने | Updated: July 6, 2023 20:02 IST

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?'

डोंबिवली: मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंना लगावला. आम्ही आतापर्यंत कोणाशीही युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तीक मत असल्याकडेही पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.

गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. यावर मनसे आणि ठाकरे गटात युतीची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी युतीबाबत भाष्य करताना उध्दव ठाकरेंना लक्ष केले. युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही युती करावी? आमचे राज ठाकरे अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले, आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल ही पाटील यांनी केला.

आजच्या राजकीय परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदारशिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, या चर्चेवरदेखील पाटील यांनी भाष्य केले. या त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. मात्र या गोष्टीची सुरूवात उध्दव ठाकरे यांच्यापासून झाली. लोकांनी दिलेला कौल मान्य करून, लोकांच्या मताला मान देऊन, हिश्शासाठी भांडत बसले नसते आणि सरकार बनवले असते तर या गोष्टीच उदभवल्या नसत्या. त्यामुळे एकटया फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात सगळं घडलं. त्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत आहे, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेShiv Senaशिवसेना