शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:37 IST

ठाण्यातील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने श्राद्ध घालून निषेध केला.

ठळक मुद्देबॉलीवूड थीम पार्क प्रकल्पातील भ्रष्ट अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनसेने घातले श्राद्ध श्राद्ध घालून मनसेने केला निषेधराजेंद्र कांबळे या कार्यकर्त्याने केले मुंडन

ठाणे : वर्तकनगर रुणवाल प्लाझा येथील बॉलीवूड थीम पार्क प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाºयांचे व त्यांना पाठीशी घालणाºया लोकप्रतिनिधींचे मनसे ओवळा माजीवडा विधानसभेच्यावतीने या प्रकल्पाच्या जागेवर सोमवारी सवर्पित्री अमावस्येनिमित्त श्राद्ध घातले. तसेच, मनसेच्या एका कार्यकर्त्याने मुंडन करुन अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा निषेध केला.ठाणे महापालिकेने २५ आॅगस्ट २०१४ रोजी बॉलीवूड थीम पार्क या प्रकल्पाचे भूमिपुजन केले. त्यानंतर या कामास सुरूवात झाली पण ते अर्ध्यावर थांबले. अजतागायत हे काम पुर्णत्वास आले नाही. याकडे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनविसे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला आहे. यावेळी मनसैनिकांनी काव काव ऐवजी ‘खाव खाव’ असा नारा दिला. जिवंतपणी पैसे खाणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी हे उद्या हयात राहीले नाही तर त्यांच्या पिंडाला कावळा शिवण्यासाठी पैशेच ठेवावे लागतील म्हणून आम्ही पैशाचा नैवेद्य दाखविला असल्याचे पाचंगे म्हणाले. या थीप पार्क प्रकल्पाच्या जागेवर सुरूवातीला आप्पासाहेब पवार उद्यान होते. या ठिकाणी परिसरातील नागरिक फेरफटका मारण्यासाठी, लहान मुले खेळण्यासाठी येत असत. त्या जागेवर विशेष प्रकल्प म्हणून बॉलीवूड थीम पार्क उभारण्याचे काम सुरू केले. परंतू ते अर्धवटच राहिले आहे. ही जागा अनेक महिन्यांपासून पडीक आहे, त्यावर झाडे वाढून जंगल झाले आहे, संध्याकाळच्या वेळेस तेथए गर्दुल्ल्यांचा अड्डा झाला आहे. स्थानिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हे आंदोलन केल्याचे मनसेने सांगितले. या प्रकल्पाचे कंत्राट कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी मनसेने केली आहे. या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ राजेंद्र कांबळे या कार्यकर्त्याने मुंडनही केले आहे. यावेळी पुष्कर विचारे, किरण पाटील, सौरभ नाईक, सचिन सरोदे, दीपक जाधव, प्रमोद पाताडे व इतर मनसैनिक उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका