शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र नगरपालिकेसाठी मनसेही आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:19 IST

२७ गावांचा मुद्दा :...तर आमचे नगरसेवकही राजीनामा देतील, राजू पाटील यांचे पत्र

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी, यासाठी सर्वपक्षीय युवा मोर्चाने गुरुवारी आक्रमक पवित्रा घेत स्वतंत्र नगरपालिकेच्या कार्यवाहीत खोडा घालणाऱ्यांना आंदोलनाद्वारे समज दिली. दरम्यान, या आंदोलनाला मनसेचे नेते राजू पाटील यांनी पत्र पाठवून पाठिंबा दर्शवला.गावांच्या भल्यासाठी संघर्ष समितीच्या पाठिंब्यावर व भाजपा तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवल्यास मनसेचे दोन्ही नगरसेवक त्यांच्या पदाचा राजीनामा देतील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली आहे.बेताल वक्तव्य करून खोडा घालण्याचे प्रकार थांबवा, अन्यथा घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा गुरुवारी युवा मोर्चाने दिला. दरम्यान, मनसे नेहमीच संघर्ष समिती व युवा मोर्चा यांच्यासोबत आहे, असे पत्र पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना पाठवले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ आॅगस्टची सकाळ २७ गावांतील नागरिकांची इच्छापूर्ती करणारी असेल, असे भाकीत केले होते. सरकारद्वारे आश्वासने नेहमीच दिली जातात. परंतु, दुर्दैवाने अंमलबजावणी मात्र केली जात नाही. मुख्यमंत्र्यांनी हे तशाच प्रकारचे आश्वासन तर दिले नाही ना, याबद्दल पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे.१५ आॅगस्टपूर्वी अंमलबजावणी व्हावीमुख्यमंत्र्यांनी २७ गावांना स्वतंत्र नगरपालिकेचा दर्जा देऊन आम्हाला ती १५ आॅगस्टपर्यंत मिळवून द्यावी. पालिकेला कोणी विरोध करत असेल, तर त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाकल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, याचाही विचार झाला पाहिजे, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याण