शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का? म्हणत तक्रार करायची अन् कारवाई झाल्यावर...;  मनसेचा दुटप्पीपणा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:42 IST

Miraroad News : मीरा रोडच्या नयानगर मधील बाणेगर शाळा गल्ली येथील फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी म्हणून रहिवाशांच्या पालिकेपासून थेट शासनापर्यंत तक्रारी केल्या जात आहेत.

मीरा रोड - कोरोना संक्रमण काळात फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का? विचारत तक्रार करायची आणि दुसरीकडे महापालिकेने कारवाई केल्यावर मात्र जावई असल्यासारखं कळवळा दाखवत फेरीवाल्याला नवीन हातगाडी द्यायची असला मनसेचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. 

मीरा रोडच्या नयानगरमधील बाणेगर शाळा गल्ली येथील फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी म्हणून रहिवाशांच्या पालिकेपासून थेट शासनापर्यंत तक्रारी केल्या जात आहेत. तक्रारींवर या आधी सुद्धा महापालिकेने कारवाई केली होती. नव्याने तक्रार आल्यावर पालिकेने पुन्हा कारवाई केली. 

या कारवाई वेळी एक फेरीवाला कामात अडथळा आणत असल्याने पोलिसाने त्याला बाजूला केले. पालिकेने फेरीवाल्याचे हातगाडी वरील समान खाली टाकून हातगाडी तोडल्याचा व्हिडीओ वायरल झाला. पालिकेने हातगाडी तोडली परंतु कारवाईत अडथळा आणणाऱ्या फेरीवाल्यावर गुन्हा दाखल केला नाही. परंतु त्या व्हायरल व्हिडीओनंतर मनसेच्या अविनाश जाधव, संदीप राणे या काही नेत्यांनी जाऊन फेरीवाल्याला नवीन हातगाडी दिली व त्याच्याबद्दल कळकळ व्यक्त केली. 

फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून मनसेचे मीरारोड उपशहर अध्यक्ष सचिन पोपळे यांनीच कारवाईसाठी महापालिका आयुक्तांना २८ जून रोजी पत्र दिले होते. त्या पत्रात पोपळे यांनी, फेरीवाले हे काय महापालिकेचे जावई आहेत का? असा सवाल करत फेरीवाल्यांवर कारवाई न करणाऱ्या प्रभाग अधिकारी व फेरीवाला पथकांवर कारवाई करा अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. म्हणजेच एकीकडे फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही म्हणून ते जावई आहेत का? असा सवाल करायचा आणि दुसरीकडे पालिकेने कारवाई केली की मग फेरीवाल्याचा कळवळा व्यक्त करून त्याला हात गाडी द्यायची. यामुळे फेरीवाला पालिकेचा की मनसेचा जावई? अशी चर्चा होऊ लागली आहे. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMNSमनसेhawkersफेरीवाले