शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अखेर  मीरा भाईंदरमध्ये मनसेला मिळाला नवीन शहराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 12:20 IST

केवळ पोकळ इशारे द्यायचे वा निवेदने नेताना फोटो काढून घ्यायचे पण शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा नाही, अशा काही कार्यपद्धतीमुळे अनेक मनसैनिक नाराज आहेत.

मीरारोड : मीरा भाईंदर मनसेच्या शहर अध्यक्षपदी हेमंत सावंत यांची नियुक्ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे पद रिक्त होते. मीरा भाईंदर मनसेमध्ये गटबाजी मोठ्याप्रमाणात असल्याचे दिसून येते. त्यातच शहरातील महत्वाच्या समस्या व विषयांवर मनसेने कोणतीच भूमिका घेतली नसल्याचे समजते. 

केवळ पोकळ इशारे द्यायचे वा निवेदने नेताना फोटो काढून घ्यायचे पण शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा नाही, अशा काही कार्यपद्धतीमुळे अनेक मनसैनिक नाराज आहेत. शहराध्यक्ष असलेले प्रसाद सुर्वे  आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये खटके उडत होते.  प्रवाद सुर्वे तर मला विचारल्याशिवाय पत्र व्यवहार करायचा नाही, असा कारभार चालवत असल्याची नाराजी मनसैनिकांमध्ये होती.विधानसभा निवडणुकीआधी भाजपाचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांच्या उपस्थितीत प्रसाद सुर्वे यांनी मनसेला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून सदरचे पद रिक्तच होते. राज ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदी हेमंत सावंत यांची नियुक्ती केली असून स्वत: ठाकरे यांनी तसे नियुक्ती पत्र दिले. त्यावेळी ठाणे - पालघर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव सह दिनेश कनावजे, शशी मेंडन आदी उपस्थित होते.

सावंत यांना मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यासह मनसैनिकांना एकत्र आणण्याचे मोठे आव्हान आहे. शहर व पालिकेतील विविध विषयांवर आवाज उठवून नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. २००७ सालच्या महापालिका निवडणुकीत मनसेचे चार नगरसेवक निवडून आले होते.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMNSमनसे