ठाणे : डोंबिवली येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ३३ राक्षसांना फाशी द्या, नाही तर त्यांचे गुप्तांग कापा, अशी मागणी करणारे बॅनर शनिवारी मनसेने ठाण्यातील चंदनवाडी परिसरात लावले. या बॅनरवर मनसेने ३३ तोंडाचा बलात्कारी राक्षस दाखविला आहे.
डोंबिवली येथे घडलेल्या घटनेवरून सर्वत्र संतप्त व्यक्त केला जात असताना मनसेनेदेखील या घटनेचा निषेध करून ही घटना निंदनीय असल्याचे म्हटले आहे. पक्षाचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी बलात्कार करणाऱ्यांना वेळेत फाशी देण्याची मागणी केली आहे. तसेच रामायणात दहा तोंडांच्या रावणाविषयी ऐकले होते; परंतु डोंबिवलीत ३३ तोंडांचे रावण पैदा झाले आहेत. या ३३ तोंडी राक्षसांना सरकारने ठेचले पाहिजे, असे सांगून त्यांनी संताप व्यक्त केला.
--------------
...तर तुम्ही खरे भाई -महेश कदम
ठाणे जिल्ह्यात जे स्वतःला ‘भाई’ संबोधतात. अशा गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी या राक्षसांना पहिले मारले पाहिजे, तर तुम्ही खरे भाई, असे आव्हानदेखील कदम यांनी दिले आहे.