शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फूड व्हॅन, ओपन ट्रक मार्केटचा पर्याय देऊन नवी योजना राबवण्याची मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:43 IST

फेरीवाला परवाना सर्वेक्षण पुन्हा करुन मराठी तरुणांना प्रोत्साहन द्या अशी मागणी मनसेने केली आहे.

ठळक मुद्देसुविधा भुखंड खुले करा - मनसेफेरीवाला परवाना सर्वेक्षण पुन्हा करुन मराठी तरुणांना प्रोत्साहन द्या : मनसेस्थानिकांना संधी...हीच सक्षमीकरणाची नांदी

ठाणे : कोरोनाकाळात दोन ते अडीच महिन्यात हातातील नोकर्‍या गेलेल्या शेकडो मराठी तरुणांनी व्यवसायाकडे मोर्चा वळवला आहे. नवनवीन संकल्पना घेऊन पुढे आलेल्या या होतकरु स्थानिक मराठी तरुणांना ठाणे पालिकेने आता पुन्हा फेरीवाला परवाना सर्वेक्षण करुन योजनेत सामील करुन घ्यावे. या सोबत परंपरागत पदपथ अडवून केल्या जाणार्‍या फेरीवाल्यांच्या व्यवसायाला छेद देत 'बिझनेस आॅन व्हील' ही अनोखी संकल्पना राबवून मोहिमेचा श्रीगणेशा करण्याची आग्रही मागणी मनसेने केली आहे.

ठाणे पालिकेने मागीलवर्षी फेरीवाला सर्वेक्षण केले होते. माञ अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसून कोरोना काळात बहुतांश परप्रांतिय फेरीवाले गावाकडे परतल्याने ठाणे शहरात मराठी तरुणांना रोजगाराची नामी संधी उपलब्ध झाली आहे. या काळातच तरुणांच्या नोकर्‍याही हातच्या गेल्याने त्यांनी भाजी, फळे, मत्स्य, जीवनावश्यक वस्तूंचे आॅनलाईन मार्केट सुरु आहे. याच तरुणांना फेरीवाला सर्वेक्षणात नव्याने सामील करुन त्यांना शहराच्या विविध भागात 'बिझनेस आॅन व्हील' या संकल्पनेनुसार रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी आज आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली. मराठी तरुणांना अनधिकृत व्यवसाय करण्यात स्वारस्य नाही. त्यामुळे ठाणे पालिका प्रशासनाने 'पुनश्च हरिओम' या नात्याने फेरीवाला सर्वेक्षणात या तरुणांना संधी द्यावी. अधिकृतरित्या धंद्यात पाय रोवण्यासाठी बळ द्यावे, अन्यथा भविष्यात मराठी विरुध्द कोरोनाकाळात धंदा सोडून पळालेले परप्रांतिय असा संघर्ष उध्दभवण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

      शहराच्या प्रत्येक मध्यवर्ती भागात सुविधा भूखंड उपलब्ध आहेत. याच ठिकाणी अथवा गृहसंकुलाच्या आवारात या तरुणांच्या ओपन ट्रक, फूड व्हॅनना परवानगी द्यावी. त्यांना धंदा उभा करण्यासाठी वित्तीय साहाय्य, कौशल्य विकास योजनेच्या अनुषंगातून मार्गदर्शन करावे अशीही मागणी निवेदनातून संदीप पाचंगे यांनी केली अाहे. भविष्यात कोरोनानंतरच्या जगात अशाच व्यवसायांची गरज असून ठाणे पालिका प्रशासनाचा हा पॅटर्न राज्यात पथदर्शी ठरेल, हा विश्वासही पाचंगे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेtmcठाणे महापालिका