शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

"भोंग्यांबाबत बोलता मग तुम्ही काल घेतलेल्या सभेबाबतही माफी मागा, कारण...", आव्हाडांनी ठेवलं नियमांवर बोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 12:39 IST

राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास होतो असं म्हणतात मग त्यांनी काल ज्या ठिकाणी सभा घेतली तिथं बाजूला दोन शाळा आहेत. मग तुमच्या कार्यकर्त्यांना नियम माहित नव्हता का?

ठाणे-

राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांमुळे त्रास होतो असं म्हणतात मग त्यांनी काल ज्या ठिकाणी सभा घेतली तिथं बाजूला दोन शाळा आहेत. मग तुमच्या कार्यकर्त्यांना नियम माहित नव्हता का?, असा सवाल राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी काल ठाण्यातील जाहीर सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला होता. त्यास आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. 

"राज ठाकरे भोंग्यांबाबत बोलले. पण आपण जे बोलतो त्याचा जरा अभ्यास त्यांनीही करायला हवा. नियमांवर बोट ठेवायचं झालं तर काल ज्या ठिकाणी त्यांनी सभा घेतली तिथं बाजूलाच दोन शाळा आहेत. कोर्टाच्या निर्णयानुसार शाळेच्या १०० मीटर परिसरात मोठ्या आवाजात कोणतेही कार्यक्रम किंवा सभा घेता येत नाही. तरीही तुम्ही त्याच जागी सभा घेतली. मग हा नियम तुमच्या कार्यकर्त्यांना माहित नव्हता का? राज ठाकरे कालच्या सभेसाठी माफी मागणार का?", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

महागाईच्या मुद्द्यावर राज ठाकरे गप्प का? "राज ठाकरेंना काल मुळातच सभा का घ्यावी लागली. याचा त्यांनी स्वत: विचार करावा. त्यांच्या पक्षातच कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या मुद्द्यांवर तुम्ही बोलता. एखाद्यानं दंगल घडविण्याची सुपारीच घेतली असेल तर त्याला आपण तरी काय करणार? राज ठाकरे महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढीवर का बोलत नाहीत? त्यांना देशातील महागाई दिसत नाही. त्याबद्दल त्यांनी एक चकार शब्द देखील काढला नाही", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

राजकीय व्यासपीठावर एक नवा 'जॉनी लिव्हर' सापडलाय"आपण ज्यांच्या पुण्याईवर जीवंत आहोत. त्यांचा मान राखा. प्रबोधनकारांच्या पुण्याईमुळे लोक तुम्हाला ऐकायला येतात. हे असे खेळ करुन जे आहे ते सुद्धा गमावू नका. मला गरागरा फिरवून टाकू म्हणालात एकदा तुमच्या भाषणाचा व्हिडिओ तुम्हीच पाहा. त्यावर कौतुकापेक्षा स्माइली जास्त आलेत. समाजाला राजकीय व्यासपीठावर नवा जॉनी लिव्हर सापडलाय असं लोक म्हणू लागलेत", असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.