शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

DahiHandi MNS: निर्बंध झुगारले! पोलीस बंदोबस्तात ठाणे, मुंबईत मनसेने दहीहंड्या फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:02 IST

MNS break Dahi handi: रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली.

कोरोनामुळे (corona) राज्य सरकारने दहीहंडी उत्सव साजरा करण्यास मनाई केलेली आहे. यामुळे भाजपा, मनसेने (MNS) याला विरोध केला असून ठाणे, मुंबईत दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचे मनसेने सांगितले होते. यामुळे पोलिस बंदोबस्तत असूनही सारे निर्बंध झुगारून मनसेने ठाणे, मुंबईत ठिकठिकाणी रात्र, पहाटेच्या सुमारास दहीहंडी उभारून, मानवी मनोरे उभारत दहीहंड्या फोडण्यात आल्या. (MNS DahiHandi in Thane, Bhandup.)

रात्री १२ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात दही हंडी फोडलील. त्या कार्य़कर्त्यांना अटक झाली, परंतू रात्री २ च्या सुमारास तात्काळ जामिनावर सुटका ही झाली. हिंदू सणांसाठी आम्ही कितीही केसेस घेऊ असे मनसेने म्हटले आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत हंडी फोडण्यात आली. यावेळी अभिजीत पानसे व अविनाश जाधव यांची पोलिसांच्या बरोबर थोडी झटापट देखील झाली. भगवती शाळेच्या मैदानामध्ये ही दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी 250 कार्यकर्ते होते. 

आम्ही जे ठरवतो ते करतो, दहीहंडी उत्सव साजरा होणारच, असे मनसेचे नेत अविनाश जाधव यांनी सांगितले होते. तसेच बाहेरील राज्यांतून आम्हाला फोन येतात, महाराष्ट्रात दहिहंडी साजरी झालीच पाहिजे, राज ठाकरेंनी ती करावी, अशी मागणी होते असेही जाधव यांनी सांगितले. तर अभिजित पानसे यांनी आम्ही मराठी सण साजरा करणारच असे म्हटले होते.

 

 यामुळे आज ठाण्यात वर्तकनगरसह काही ठिकाणी मनसेने दहीहंडी उभारत त्या फोडल्या आहेत. तसेच मुंबईतील भांडूपमध्ये देखील सकाळच्या सुमारास दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी ठाण्यात काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियमांसह दहीहंडी खेळता आली असती. थर आणि उपस्थितीबाबत मर्यादा, वयाचे बंधन घालता आले असते. सगळ्यांनी ते मान्यही केले असते; पण सणच साजरे करायचे नाहीत, ही राज्य सरकारची भूमिका चुकीची आहे, असा आरोप बाळा नांदगावकर यांनी केला आहे.  

टॅग्स :MNSमनसेDahi Handiदहीहंडीthaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या