शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुब्रमण्यम स्वामींना मनसेने विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:45 IST

राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला.

डोंबिवली : राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला. राज ठाकरे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे स्वामी यांनी सांगताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाचा दाखला देत मनसेने उत्तर भारतातील स्थलांतराचा मुद्दा मांडला. प्रत्येक मुद्द्यावर बोलणाºया स्वामी यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर का मौन बाळगले, अशी विचारणाही करण्यात आली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्वामी यांना कार्यक्रमाच्या ठिकाणीच गाठले. ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारला. स्वामी यांच्यासोबत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कदम यांची समजूत काढून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि संयमाने घ्या, अशी समजूत काढली. एक पाऊल रामराज्याच्या दिशेने या विषयावर व्याख्यानासाठी स्वामी शनिवारी रात्री डोंबिवलीत आले होते. केवळ भाषणात टीका करून स्वामी थांबले नाहीत, तर पत्रकार परिषदेतही त्यांनी वक्तव्य सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले. ठाकरे यांना डीएनएची कल्पना असल्यानेच ते आती यूपीवाल्यांविरोधात काही बोलत नसल्याचा दावा स्वामी यांनी केला. मराठी माणसाने परप्रांतात घुसखोरी केली. रोजगार ओरबडला आणि कायदे तोडले तर चालेल का, असा सवाल कदम यांनी केला. काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन स्वामी यांनी राज्या-राज्यात भांडणे लावण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला.

टॅग्स :MNSमनसे