शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात कर्तव्यदक्ष पोलिसांच्या कार्याचे ‘मनसे’ कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:34 IST

उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचविणा-या वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि संतोष मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून वाचविले होते महिलेचे प्राण ठाण्याच्या उपवन तलाव येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: आपला जीव धोक्यात घालून उपवन तलावात आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेचे प्राण वाचविणा-या वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि संतोष मोरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. नवनिर्माण सेनेच्या वर्तकनगर शाखेतर्फे शनिवारी विशेष सत्कार करण्यात आला. या दोघांच्याही कार्याचे मनसेने कौतुक केले.वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कान्स्टेबल गजेंद्र सोनटक्के आणि पोलीस नाईक एस. पी. मोरे हे शुक्रवारी सायंकाळी उपवन तलाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महिला तलावात आत्महत्येचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांना दोन तरुणींनी दिली. ही माहिती मिळताच सोनटक्के यांनी त्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत या महिलेने तलावात उडी घेतली. तिच्यापाठोपाठ सोनटक्के यांनीही उडी घेऊन अवघ्या काही मिनिटांमध्ये तिला या तलावातून सुखरुप बाहेर काढले. वर्तकनगर पोलिसांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल मनसेचेठाणे शहर सचिव रवींद्र सोनार, विधानसभा सचिव सौरभ नाईक, ठाणे सांस्कृतिक विधानसभा अध्यक्ष प्रसाद भांदिगरे, उपविभाग अध्यक्ष निलेश चौधरी, शाखाध्यक्ष संतोष निकम, सागर भोसले, हेमंत महाले, मनविसे उपविभाग अध्यक्ष निखिल जाधव आदींनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात सोनटक्के आणि मोरे या पोलिसांचा सत्कार केला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हेही उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेPoliceपोलिस