शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मनसे शहराध्यक्ष नियुक्ती विरोधात मनसैनिक एकवटले

By धीरज परब | Updated: February 13, 2024 19:26 IST

मीरारोड - मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी अन्य पक्षातून आलेले संदीप राणे यांच्या नियुक्ती विरोधात शहरातील मनसैनिकांनी व ...

मीरारोड - मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी अन्य पक्षातून आलेले संदीप राणे यांच्या नियुक्ती विरोधात शहरातील मनसैनिकांनी व आजी - माजी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन मीरारोडच्या एका सभागृहात सभा घेतली. त्यात अनेक मनसैनिकांनी आपले अनुभव आणि नाराजी व्यक्त करत शहर अध्यक्ष बदलण्याची मागणी केली.

मीरा भाईंदर मनसे शहर अध्यक्ष पदी संदीप राणे यांची नियुक्ती केली गेली. अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते राणे यांना नियुक्ती पत्र दिल्यानंतर शहरातील अनेक मनसैनिकांनी राणे यांच्या नियुक्ती बद्दल आश्चर्य तसेच नाराजी व्यक्त केली होती. 

मनसेचे शहर अध्यक्ष आणि विद्यार्थी सेनेपासून राज यांच्याशी एकनिष्ठ असलेले हेमंत सावंत यांना अनेक पदाधिकारी व मनसैनिकांनी भेटून राणे यांच्या नियुक्तीचा निषेध करत राजीनामे देण्याची तयारी दाखवली होती. परंतु आधी राज ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरले मात्र अद्याप राज यांची भेट नाराज मनसैनिकांना मिळू न शकल्याने भेट न होऊ देण्या मागे देखील जिल्ह्यातील नेत्याचा हात असल्याचे सांगितले जाऊ लागले. 

दरम्यान नाराज मनसैनिकांनी मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंप जवळील सभागृहात रविवारी सभा घेतली. त्या मध्ये माजी शहर अध्यक्ष हेमंत सावंत सह महिला उपजिल्हाध्यक्ष पुतुल अधिकारी, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सचिन पोपळे, शहर संघटक दिनेश कनावजे व शशी मेंडन, उपशहर अध्यक्ष रमाकांत माळी, गिरीश सोनी, मेहबूब शेख, अभिनंदन चव्हाण, मीरा भाईंदर विधानसभा अध्यक्ष वैशाली येरुणकर, विभाग अध्यक्ष रत्ना गुप्ता, संगीता राठोड, कामगार सेनेचे शेखर जाधव आदी विविध पदाधिकारी मिळून सुमारे २०० जण उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. 

या वेळी संदीप राणे यांच्या नियुक्तीला विरोध दर्शवत राणे हे मुळात शहरात रहात नसून नुकतेच पक्षात आले व त्यांना अनेक महत्वाची पदे दिली. सिनेटचे ३ तर पदवीधर चे केवळ १२ अर्ज भरले. मनसेच्या नावाखाली स्वतःची मनमर्जी करण्यासह सोयीनुसार काम करत असल्याचा आरोप करत काहींनी काही प्रकरणात प्रश्न उपस्थित केले.  त्यामुळे मनसेतील अंतर्गत वादंग चव्हाट्यावर आला असून ह्या नियुक्तीमुळे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याबद्दल सुद्धा नाराज असल्याची भावना काहींनी बोलून दाखवली.  

टॅग्स :MNSमनसे