शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

छटपूजेप्रकरणी मनसैनिकांना `चिल्लर` संबोधणाऱ्या ठाण्यातील उत्तर भारतीयाने मागितली त्यांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:40 IST

छटपुजेप्रकरणी ठाण्यातील उत्तर भारतीयाने मागितली मनसैनिकांची माफी मागितली आहे. 

ठळक मुद्देउत्तर भारतीयाने मागितली मनसैनिकांची माफीपोस्ट डिलीट केली आणि सर्वांची माफी मागितली - संदीप पाचंगेमाझा गैरसमज झाला - रजनिश सिंह

ठाणे: छटपूजा कृत्रिम तलावात करा अशी मनसेने केलेल्या मागणीवरुन सोशल मीडियावर मनसैनिकांना ‘चिल्लर’ संबोधणाऱ्या एका उत्तर भारतीय नागरिकाने पक्षाची आणि मनसैनिकांची जाहीर माफी मागितली आहे.    छटपूजेप्रकरणी मनसैनिक आणि उत्तर भारतीयांमधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. गणेशोत्सव काळात ज्या प्रमाणे प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनासाठी कृत्रीम तलावांची निर्मिती केली जाते त्या धर्तीवर छटपूजेकरिता कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी चार दिवसांपुर्वी मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे महापालिकेकडे केली होती. याबाबत उत्तर भारतीय रजनीश सिंह याने सोशल मीडियावर ही बातमी पोस्ट करुन त्यावर मनसैनिक आणि पक्षाविरोधात अपशब्द वापरले होते. मनसैनिकांना चिल्लर असे संबोधून मनसैनिकांना गमछा स्टाईलचा सामना करावा लागेल आणि हे गुजरात नसून ठाणे, महाराष्ट्र आहे हे लक्षात ठेवा अशी धमकी वजा आव्हान दिले होते. रविवारी ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ही पोस्ट सिंह याने टाकल्यावर मनसैनिकांमध्ये संताप उसळला आणि सिंह याच्या पोस्टवर त्यांनी उलटप्रश्न विचारण्यास सुरूवात केली. मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे आणि ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी त्याचा पत्ता शोधून काढला. वातावरण दूषित होऊ नये म्हणून आम्ही रितसर वागळे इस्टेट पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात तक्रार केली. पोलीसांनी सिंह याला बोलवून समज दिली. पुन्हा असे माझ्याकडून होणार नाही अशी कबुली त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेला दिली असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. -------------------------------------*मनसे विद्यार्थी सेनेचा विरोध हा छटपुजेला आहे असा माझा गैरसमज झाला आणि मी कोणताही विचार न करता त्यांच्या विरोधात पोस्ट टाकली. दोन - तीन तासांनी मला त्यांचा मुद्दा हा स्वच्छतेला घेऊन असल्याचे समजले मी तात्काळ ती पोस्ट डिलीट केली आणि सर्व मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची स्वत: संपर्क करुन, त्यांना मेसेज पाठवून माफी मागितली. मी चुकीचे लिहीले होते याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे. माफी मागितल्यावर मनसे विद्यार्थी सेनेने मला समजून घेतले.- रजनिश सिंह*रजनिश सिंह याने घाबरुन ती पोस्ट डिलीट केली आणि सर्वांची माफी मागितली. आम्ही त्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. जो पक्षा विरोधात किंवा राज ठाकरे यांच्या विरोधात बोलेल त्याचा असाच समाचार घेतला जाईल.- संदीप पाचंगे, ठाणे जिल्हा अध्यक्ष, मनविसे*रजनिश सिंह याने मला स्वत: फोन केला होता. तसेच, रात्री दोन वाजता भेटून माफी मागितली आहे. आम्हीही त्याला समज दिली आहे.- किरण पाटील, शहर अध्यक्ष, मनविसे

टॅग्स :thaneठाणेRaj Thackerayराज ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र