शहरं
Join us  
Trending Stories
1
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
3
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
4
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
5
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
6
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
7
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
8
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
9
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
10
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
11
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
12
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
13
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
14
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
15
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
16
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
17
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
18
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
19
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

भिवंडीतील पद्मावती इस्टेटमधील अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीएची कारवाई; १७० कुटुंबांवर बेघर होण्याची आली वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 20:18 IST

Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या ९ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तोडू कारवाई करण्यात आली आहे.

- नितिन पंडीत भिवंडी  -  तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या ९ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तोडू कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम विकासक व जागा मालक यांच्यातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्या नंतर हि तोडू कारवाई करण्यात आली आहे . तर दुसरीकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या इमारतींवर कारवाई झाल्याचा आरोप येथील रहिवासींनी केला आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकट असतानाही अशा परिस्थितीत पद्मावती इस्टेट येथील इमारतींवर झालेल्या तोडू कारवाईमुळे या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे १७० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे . दरम्यन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नारपोली पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बांधकाम विकासक रसिक शाह यांनी कशेळी ग्राम पंचायत हद्दीत पद्मावती इस्टेट या ठिकाणी निवासी संकुल बांधले असून शासनाची आवश्यक ती कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे याठिकाणी निवासी इमारती बांधल्या आहेत . त्यातच बांधकाम विकासक रसिक शाह व जमीन मालक सुनिता मदरानी व इतर यांनी विकासकाला विरोधात जन हिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २७ एप्रिल २०२१ रोजी सुनावणी करत असताना एमएमआरडीए च्या महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांना न्यायालयाच्या समोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव हे २९ एप्रिल रोजीच्या सुनावणीस  हजर झाले. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी मधील बेकायदा इमारतीच्या बांधकामांवर एमएमआरडीए कोणतीही कारवाई करत नसल्याने फटकारले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात? अशा अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीएने कोणती कारवाई केली किंवा त्यासंदर्भात कोणती कारवाई प्रस्तावित आहे? तसेच बांधकाम होत असताना डोळे झाक करत असलेल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा प्रस्तावित आहे? भविष्यात असे अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी एमएमआरडीए काय पावले उचलणार आहेत? या बाबत एमआरडीएने  ६ मे २०२१ रोजी च्या तारखेला उत्तर दाखल करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. त्यावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी सदरचे अनधिकृत बांधकाम दिनांक ६ मे २०२१ रोजी च्या तारखेच्या आत तोडण्यात येईल, असे निवेदन दिले असल्याची माहिती समोर येत आहे .  एमएमआरडीए कडून त्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही सूचना न देता सोमवारी सकाळी थेट इमारती तोडण्याची कारवाई झाल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यात नागरिक तसेच इमारतीतील रहिवासी गुंतलेले असल्याने हि तोडू कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने या तोडू कारवाई दरम्यान नागरिकांनी एकच हाहाकार माजविला होता . या तोडू कारवाईमुळे येथील रहिवाश्यांच्या संसार कोरोना संकटात रस्त्यावर आल्याने आता आसरा घायचा कुठे असा यक्ष प्रश्न येथील रहिवाशींना पडला आहे . 

टॅग्स :bhiwandiभिवंडी