शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 19:01 IST

मनसे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली

डोंबिवलीकल्याण-शीळ रोडवरील निळजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक ठरला होता. मात्र या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडी मध्ये अधिक भर पडली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी एम.एस.आर.डी.सी ,रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाहणी केली आणि जड-अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शीळ-रोडवर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळोजा मार्गे त्यांना जाण्याचे निर्देश दिले जाईल. अंबरनाथ,बदलापूर,कल्याण,डोंबिवली मधून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनचालक मोठ्या संख्येने जात असतात. डोंबिवली शिळ महामार्गावरील असलेल्या निळजे पुलावरून जाणारी मुंबई ठाण्याच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्याने उल्हासनगर, अंबरनाथ,कल्याण डोंबिवली रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील वाहतीक कोंडी मध्ये अडकून पडत होत्या.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना करावा लागत आहे.त्यासाठी या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहनचालकांची तात्पुरती डोकेदुखी दूर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. बुधवारी आमदार राजू पाटील यांनी वाहतूक ,रेल्वे आणि एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे.यावेळी एम.एस. आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता श्री.बडोळे ,टीम लीडर संतोष गुप्ता वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, रेल्वेचे मुंबई डिव्हीजनल अभियंता ए. के.हिवाळे आणि संदीप सिन्ना यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली