शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश; भिवंडीत २०० बेडच्या माता संगोपन व बाल आरोग्य केंद्राला आरोग्यमंत्र्यांचा हिरवा कंदील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 18:52 IST

Bhiwandi News : इंदिरा गांधी रुग्णालयावर ताण पडत असल्याने येथील सेवा सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. 

नितिन पंडीत 

भिवंडीभिवंडी शहरासह ग्रामीण भंगार शासकीय आरोग्य यंत्रणा तितकीशी प्रभावी नसल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या अडचणी निर्माण होत असतात. शहरातील रुग्णांसाठी शहरात स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय हे एकमेव रुग्णालय असल्याने नागरिकांना उपचारासाठी तसेच महिलांना प्रसूतीसाठी नेहमीच ठाणे, कळवा तसेच मुंबई येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जावे लागत असल्याने रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यातच वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्ण पुढील उपचारासाठी जाताना प्रवासातच दगावल्याच्या देखील अनेक घटना घडल्या आहेत. त्यातच इंदिरा गांधी रुग्णालयावर ताण पडत असल्याने येथील सेवा सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत. 

या सर्व बाबींची गंभीर दखल घेत भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांच्याकडे सतत पाठपुरावा करत भिवंडीत इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्र निर्माण करण्याची लेखी मागणी केली होती. बुधवारी आरोग्यमंत्री टोपे यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीत आरोग्य मंत्री टोपे यांनी आमदार रईस शेख यांची मागणी मान्य करत भिवंडीत २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्राला मंजुरी दिली असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली असून केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी देखील हे प्रकरण केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे पाठविण्यात येणार असून त्याचाही पाठपुरावा घेऊन केंद्र शासनाची मंजुरी देखील या केंद्रासाठी लंबवकारात लवकर मिळवून देण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे स्वतः पुढाकार घेणार असल्याची माहिती देखील आमदार शेख यांनी दिली आहे. या २०० खाटांचे माता संगोपन व बाल आरोग्य केंद्रामुळे भिवंडीतील आरोग्य यंत्रणेवरचा ताण निश्चितच कमी होणार असून महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे केंद्र भिवंडीकरांसाठी उपयुक्त ठरणार असल्याने नागरिकांनी आमदार शेख यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडीRajesh Topeराजेश टोपेhospitalहॉस्पिटल