शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आमदार गोळीबार प्रकरण गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे

By सदानंद नाईक | Updated: February 6, 2024 17:45 IST

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे.

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांनी एकून १० राऊंड फायर केल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या दोन रिव्हॉल्वर व फायर केलेल्या गोळ्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठविणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक हर्षल केणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकून १० राऊंड फायर होऊन, गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांच्या अंगातून ६ तर राहुल पाटील यांच्या अंगातून २ गोळ्या रुग्णालयात शस्त्रक्रियाद्वारे बाहेर काढल्या आहेत. तर फायर केलेल्या दोन गोळ्या भिंतीवर लागल्या होत्या.

आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांच्याकडून जप्त केलेल्या रिव्हॉल्वर व फायर झालेल्या गोळ्याची तपासणी फॉरेन्सिक लॅबद्वारे होणार आहेत. गायकवाड व केणे यांच्या अंगातून काढलेल्या गोळ्या आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांच्या रिव्हॉल्वर मधून निघाले का? यांची तपासणी फॉरेन्सिक लॅब मध्ये होणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे. आमदार गणपत गायकवाड यांना सुरक्षेच्या कारणास्तव हिललाईन ऐवजी कळवा पोलीस ठाण्यात ठेवून तपास ठाणे क्राईम ब्रँच करीत आहेत. सोमवारी दिवसभर क्राईम ब्रँचच्या पथकाने तपासासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. तसेच पोलीस ठाण्याच्या प्रांगणातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून धिंगाणा घालणाऱ्या दोन्ही गटाच्या समर्थकांची पोलिस ओळ्खपरेड सुरू करणार आहेत. क्राईम ब्रँचच्या या ओळ्खपरेडने दोन्ही गायकवाड समर्थकात भीती निर्माण होईन त्यातील अनेकजण भूमिगत झाले आहे. 

नादुरुस्त कॅमेऱ्याची दुरुस्ती हिललाईन पोलीस ठाण्यातील प्रांगणातील काही सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने, महत्वाचे रेकोर्ड झाला नाही. त्या बंद कॅमेऱ्याची दुरुस्ती मंगळवारी करण्यात आली. गोळबाराच्या दिवसी पोलीस प्रांगणात गर्दी केलेल्या दोन्ही गायकवाड समर्थकानी घातलेला धिंगाणा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. 

वैद्यकीय तपासणी पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे व संदीप सरवनकर यांची वैद्यकीय तपासणी डॉक्टर पोलीस ठाण्यात आणून केली जाते.

टॅग्स :Ganpat Gaikwadगणपत गायकवाडMahesh Gaikwadमहेश गायकवाडulhasnagarउल्हासनगर