शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

काेर्टाची दिशाभूल, गँगस्टर भासविले! जितेंद्र आव्हाड यांचा पोलिसांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2023 09:34 IST

आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते.

ठाणे - ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून थेट सर्वोच्च न्यायालयाचीच दिशाभूल केली आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. एका खटल्यात ठाणे पोलिसांनी आपणावर चक्क २४ गुन्हे दाखल असल्याचे नमूद करणारे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचे ते म्हणाले. तसेच पोलिसांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले होते त्यात आपल्याला गँगस्टर असल्याचे भासविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

आव्हाड व त्यांच्या कुटुंबीयांवर अश्लील पोस्ट करणाऱ्या एका व्यक्तीसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावली. तसेच ज्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. त्याच न्यायालयात तीन महिन्यांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. यासंदर्भात आव्हाड यांनी माहिती दिली. तर या व्यक्तीच्या मागे  सर्वशक्तिमान व्यक्तीसह राज्य सरकारही उभे होते. आर्थिक शक्तीच्या जोरावर ती व्यक्ती आपली तलवार सर्वोच्च न्यायालयात चालवीत होती, असा आरोपही त्यांनी केला.

करमुसे प्रकरण वगळता माझ्यावर एकही शारीरिक इजेचा गुन्हा नाही. जे २४ गुन्हे दाखविले आहेत. ते राजकीय-सामाजिक आंदोलनातील असून २० गुन्हे निकाली निघाले आहेत. आंदोलनातील गुन्हे असणारी माणसेच राजकारणात असतातच; असे गुन्हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही आहेत. मग, त्यांनाही गुन्हेगार म्हणणार का, असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

पोलिसांनी असे राजकारण का करावे?जितेंद्र आव्हाड यांनी प्रधानमंत्री व  गृहमंत्री यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कमेंट करतात असे आरोप माझ्यावर होत आहेत. जर मी अशी टीका केली आहे, तर माझ्यावर तशी केस का घेतली नाही? अमरसिंह जाधव यांचे हे प्रतिज्ञापत्र आयुक्तांना विचारल्याशिवाय सादर झालेले नसणार! असेही त्यांनी सांगितले. दरम्यान,खटला मजबूत व्हावा, यासाठीच हरहर महादेव व ३५४ चा गुन्हा माझ्यावर नोंदविला. पोलिसांनी राजकारण का करावे? असा सवालही त्यांनी केला.

अहवालही त्यांना हवा तसाच येईलसहायक आयुक्त महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप फॉरेन्सिककडे पाठविली जाईल आणि त्यातील आवाज हा त्यांचा नसेल, असाच अहवाल येईल, असा दावा आव्हाड यांनी केला. 

आव्हाडांची चौकशी होणार याचा आनंदआपल्याला केलेल्या मारहाण प्रकरणी तपास  सुरू ठेवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कोणीही चौकशी करावी. आव्हाडांची चौकशी होणार याचा आनंद असल्याचे अनंत करमुसे यांनी म्हटले आहे..

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड