शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुजारीचा हस्तक मिरचु शर्मा उल्हासनगरातून गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 04:54 IST

खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारी याने एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शर्माला अटक केली असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मोक्कोंतर्गत गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आला होता.

ठाणे : कुख्यात गुंड सुरेश पुजारी याचा हस्तक मिरचु शर्माला (५१) ठाणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने शुक्रवारी उल्हासनगर येथून अटक केली. खडकपाडा पोलीस ठाण्यात पुजारी याने एका व्यापाऱ्याकडे ५० लाखांची मागणी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शर्माला अटक केली असून पाच ते सहा महिन्यांपूर्वी तो मोक्कोंतर्गत गुन्ह्यातून जामिनीवर बाहेर आला होता. तसेच त्याला येत्या १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.उल्हासनगरातील व्यापाºयाला १९ आणि २० एप्रिल २०१८ या दोन दिवसात परदेशातून सुरेश पुजारीने आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ५० लाखांच्या खंडणीसाठी फोन केला होता. त्यावेळी मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू होता. याचदरम्यान तपासात मिरचु हा उल्हासनगरातील व्यापाºयांची माहिती पुजारीपर्यंत पोहोचतो ही बाब पुढे आल्यावर शुक्रवारी पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने त्याला अटक केली. या अटकेनंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्यावर न्यायालयाने त्याला १३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याचे कोथमिरे म्हणाले.पुजारी उल्हासनगर येथे व्हीडिओ पार्लर चालवत असताना त्याच परिसरात मिरचुचे घर होते. तेथून दोघांची ओळख झाली. त्यानंतर उल्हासनगरातील प्रतिष्ठीत लोकांची बारीक-सारीक माहिती गोळा करून तो त्याला द्यायचा. तिच्या आधारे पुजारी व्यापाºयांना फोन करून धमकावत होता. तसेच मिरचुवर उल्हासनगर येथे खूनाच्या गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक होऊन मोक्कोंतर्गत कारवाई झाली होती. याच गुन्ह्यांत पाच ते सहा महिन्यापूर्वी तो जामिनीवर बाहेर आला. उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथेही खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. बदलापुरात आर्मस् अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Arrestअटकthaneठाणे