शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: फिट राईज दौडमध्ये पोलिसांपेक्षा त्यांचे नातलग ठरले अव्वल

By धीरज परब | Updated: October 27, 2023 23:34 IST

Mira Road: "फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्राम" अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलाकडून आयोजीत ५ कि.मी. च्या दौड मध्ये पोलीसां सह त्यांच्या नातलगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला व पुरुष गटात पोलिसांपेक्षा त्यांच्या नातलगांनीच अव्वल क्रमांक पटकावला. 

मीरारोड - "फिट राईज ७५ फिटनेस प्रोग्राम" अंतर्गत मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस दलाकडून आयोजीत ५ कि.मी. च्या दौड मध्ये पोलीसां सह त्यांच्या नातलगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिला व पुरुष गटात पोलिसांपेक्षा त्यांच्या नातलगांनीच अव्वल क्रमांक पटकावला. 

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी च्या स्थापनेस ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या निमीत्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतुन देशात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ते राधास्वामी सत्संग मार्ग , मीरारोड रेल्वे स्थानक पश्चिम व पुन्हा बोस मैदान  अशी  ५ किलोमीटर  अंतर ची दौड आयोजित करण्यात आली होती.

पोलिस आयुक्त  मधुकर पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दौड मध्ये अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त मुख्यालय प्रकाश गायकवाड तसेच इतर वरीष्ठ अधिकारी सह पोलीस दलातील ५४८ पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांचे नातेवाईकांनी सहभाग घेतला.  सदर दौड मध्ये महिला गटात प्रथम क्रमांक कृतीका वाघमारे हिने तर द्वितीय क्र. हवालदार रेश्मा कुटे व तृतीय क्र. उपनिरीक्षक सारिका वाघचौरे यांनी पटकावला. कृतिका ही पोलिस शिपाई रुपाली बरफ यांची बहिण आहे.

पुरुष गटामधुन निर्भय किणी ह्याने अव्वल क्रमांक पटकावला. द्वितीय क्र. अमेय गाणेकर तर तृतीय क्र. हवालदार रंजित बंगे यांना मिळाला. पहिला क्रमांक पटकवणारे निर्भय किणी हे देखील शिपाई रुपाली बरफ यांचे बंधू आहेत. तर अमेय हा हवालदार नारायण गाणेकर यांचा मुलगा आहे.  विजेत्यांना अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :mira roadमीरा रोडPoliceपोलिस