शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड : साडेतीन महिन्यांनंतर पालिकेने दिली मैदानातील बेकायदा प्रवेश व चित्रिकरणाची पोलिसात फिर्याद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 19:20 IST

महापालिकेच्या मैदानात बेकायदा प्रवेश करुन चित्रिकरण केल्याप्रकरणी तब्बल साडे तीन महिन्यांनी पालिकेने सबंधित टेलटेल मीडियाच्या प्रतिनिधीविरोधात फिर्याद दिल्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय

मीरारोड - महापालिकेच्या मैदानात बेकायदा प्रवेश करुन चित्रिकरण केल्याप्रकरणी तब्बल साडे तीन महिन्यांनी पालिकेने सबंधित टेलटेल मीडियाच्या प्रतिनिधीविरोधात फिर्याद दिल्यावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मीरा रोडच्या नया नगर परिसरात आला हजरत खाँ नावाने पालिकेचे क्रीडा मैदान आहे. २३ आॅक्टोबर २०१७ रोजी सदर मैदानात कुठल्या तरी मालिकेसाठी चित्रिकरण सुरु असल्याची तक्रार तत्कालिन प्रभाग अधिकारी जगदिश भोपतराव यांना मिळाली होती. त्या नुसार भोपतराव यांनी कनिष्ठ अभियंता सचिन पवार व अन्य कर्मचारयांना मैदानात पाहणी साठी पाठवले.पवार व कर्मचारी मैदानात गेले असता तेथे चित्रीकरण सुरु असल्याचे आढळून आले. त्या ठिकाणी असलेल्या टेलटेल मीडियाचे प्रतिनिधी यांनी सुरुवातीला आपणाकडे परवानी असल्याचे सांगितले. पण चित्रिकरण आटोपून कदम हे निघून जात असताना पवार यांनी पुन्हा रोखत मैदानाचे चित्रिकरणासाठीचे एक एकर पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या मैदानाचे भाडे 1 लाख रुपये असल्याने ते भरण्यास सांगितले. कदम यांनी कार्यालयात येऊन भरतो असे सांगितले पण ते भरले मात्र नाही.विना परवानगी पालिका मैदानात चित्रिकरण केल्याने चित्रिकरण शुल्क पोटीचे १ लाख व शुल्क न भरल्याने दहा पट दंड या नुसार एकूण ११ लाख रुपये पालिकेचा महसुल बुडवल्याचा ठपका पालिकेने आता नया नगर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीत ठेवलाय. या शिवाय पालिकेची परवानगी न घेता इत्तर वापराकरीता पालिका मालमत्तेत प्रवेश केल्याने ट्रेसपासिंगचा गुन्हा प्रविण कदम विरोधात दाखल करण्यात आला आहे.वास्तविक आॅक्टोबरमध्ये तक्रार होऊन देखील पालिकेने वेळीच गुन्हा दाखल केला नाही तसेच चित्रिकरणापोटीचे शुल्क देखील वसुल केले नाही. नुकतेच भार्इंदर पश्चिम येथे आमदार नरेंद्र मेहता यांच्या तक्रारी नंतर पालिकेने चित्रीकरणाप्रकरणी दंडा सह ५ लाख रुपये वसुल केलेच शिवाय मनोज घोन्सालवीस विरुद्ध भार्इंदर पोलीस ठाण्यात फिर्याद देत गुन्हा दाखल केला होता. भार्इंदर येथील घटने नंतर आपण आमदार मेहतांना नया नगर मधील आला हजरत खाँ मैदानात झालेल्या बेकायदा चित्रिकरणाबद्दल कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले असे रमझान खत्री म्हणाले. त्या नंतर सदर प्रकरणाची सूत्रं हलू लागली व पालिकेने गुन्हा दाखल केल्याची माहिती खत्री यांनी दिली आहे.

टॅग्स :Policeपोलिस