शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा

By धीरज परब | Updated: December 24, 2025 19:19 IST

विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची निवडणूक प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या उत्तन प्रचार सभेत शासनाचे मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना व्यासपीठावर मंत्री नितेश राणे यांनी बसवले. यावेळी बोलताना, "तुम्ही जर आम्हाला मतदान केले, तर तुमचे प्रश्न सोडवू हा शब्द. पण मतदान जर दुसरीकडे केले, तर माझा स्वभाव दुसऱ्यांसारखा नाही," असा इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला.

भाईंदरच्या उत्तन येथे मंगळवारी रात्री राणे यांची सभा झाली. मी मंत्री असून प्रश्न सोडवण्याचे मला अधिकार दिले आहेत. जेट्टी, मच्छी मार्केट बनवण्याचे अधिकार माझ्या कडे आहेत. एलईडी आदींवर कारवाई होते तशी पारंपरिक मच्छीमारांवर कारवाई व्हायची नसेल तर ते अधिकार पण माझ्या कडे आहेत. बंधारा कुठे हवा सांगा. कुठे नको सांगा तो तुमच्या समोर डिसरणार नाही. मी बनवू शकतो तर बंद करण्याचे अधिकार पण माझ्या कडेच आहेत. म्हणून मत्स्य खात्याचे सहायक आयुक्त पाटलांना पण येथे स्टेजवर बसवलेले आहे. मंत्री काय बोलतात आणि उद्या पासून कसे वागायचे हे कळले पाहिजे म्हणून स्टेज वर बसवले आह असे मंत्री राणे म्हणाले.

येणाऱ्या वर्षात २६ नवीन योजना मच्छीमारांसाठी आणतोय. मच्छीमारांवर अन्याय होऊ देणार नाही. कोळीवाड्यांचा प्रश्न सोडवू. आमच्या कडेच प्रश्न सोडवायचे वॅक्सीन आहे. बाकी सर्व फुसफुस करत बसतील. आचार संहिता संपताच ठरवा मासळी मार्केटचे भूमिपूजन करू असे मंत्री राणे म्हणाले. यावेळी आमदार नरेंद्र मेहता, हेरल बोर्जिस, विद्याधर रेवणकर, संदीप बुर्केन आदी उपस्थित होते. 

आचार संहिता लागू असताना उत्तन येथील मच्छीमारांना बोलावण्यात आलेल्या निवडणुकीच्या पक्ष प्रचार सभेत व्यासपीठावर पालघर - ठाणे मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना बसवण्यात आले होते. आचार संहिता काळात शासनाच्या सहायक आयुक्ताला बसवून मच्छीमारांवर प्रभाव आणि दबाव टाकण्यासाठी मंत्रिपदाचा दुरुपयोग आणि आचार संहिता भंग केल्याचा आरोप या भागातील विविध पक्षाच्या मच्छीमार प्रमुखांनी केला आहे. कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. एकीकडे आमिष दाखवत दुसरीकडे मत दिले नाही तर प्रश्न सोडवणार नाही, योजना व सुविधा देणार नाही अश्या प्रकारची धमकीच मंत्री यांनी मच्छीमारांना दिली. पण मच्छीमार असल्या धमक्यांना भीक घालत नाही असे स्पष्ट करत अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Vote for us, or else: Nitesh Rane warns voters.

Web Summary : Minister Nitesh Rane warned voters in Uttan that problems would be solved only if they voted for BJP. He controls jetties, markets, and actions against fishermen. Opposition accuses him of violating code of conduct by pressuring fishermen for votes.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Nitesh Raneनीतेश राणे Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६