शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

मीरा भाईंदर महापालिकेचा फटाके विक्री परवाना घोटाळा, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवाशी खेळत दिले परवाने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 21:11 IST

Mira Bhayander Municipal Corporation News :  भारतीय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे.

 मीरारोड -  मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन विभागा कडून नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी असलेले भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेशच फटाका विक्रेत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासाठी धाब्यावर बसवले आहेत.  मोकळ्या मैदानात फटाके विक्रीचे स्टॉल देण्या ऐवजी चक्क भर वसाहतीत , रहदारीच्या रस्त्या लगत फटाके विक्री स्टॉलना परवाने दिल्याने अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे . ृ

 भारतिय विस्फोटक कायदा १८८४ नुसार नागरीकांच्या जिवीत आणि मालमत्तेच्या सुरक्षेची काळजी घेणे महापालिका व पोलीसांना बंधनकारक आहे. त्यातच फटाके हे अतिशय ज्वलनशील असल्याने या आधी फटाके दुकानांना आगी लागुन झालेल्या जीवघेण्या दुर्घटना पाहता फटाक्यांच्या विक्री स्टॉल करीता काटेकोर नियम व निकष मुंबई उच्च न्यायालयाने घालुन दिले आहेत. 

परंतु अग्निशमन विभागाचे महापालिका उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि संबंधित अधिकारी वर्ग हे दर वर्षी भारतिय विस्फोटक कायदा आणि उच्च न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवुन फटाके विक्री स्टॉलला परवाने देत आले आहेत . यात फटाके विक्री करणाऱ्यांना प्रचंड आर्थिक फायदा करून देण्यासाठी अर्थपूर्ण संगनमताने पालिका नियमबाह्य परवाने देत असल्याचे आरोप नवीन नाहीत . 

फटाके विक्री करण्यासाठी मोकळ्या मैदानां मध्ये परवानगी देणे तसेच नागरी वस्ती वा रहदारीचे रस्ते आदी पासुन फटाके स्टॉल लांब असणे आवश्यक आहे . पत्र्याच्या शेडचे स्टॉल तसेच तेथे अग्निशामक यंत्रणा बंधनकारक असते . तसे असताना महापालिकेने मात्र मयेकर मैदानाच्या नावाखाली प्रत्यक्षात कोणतेच मैदान नसताना भर रस्त्या लगत फटाके विक्रीचे ५ स्टॉना परवाने दिले आहेत . तसाच प्रकार भाईंदरच्या इंद्रलोक नाका, सिंघानिया मैदान , महेश नगर मैदान , पाटील मैदान , मीरारोडला  रेल्वे स्थानक जवळील मार्केट, सिल्व्हरपार्क विजय सेल्स जवळ , जांगीड सर्कल आदी भागात केलेला आहे . 

कहर म्हणजे पालिकेने पंडित भीमसेन जोशी कोरोना रुग्णालया समोरील मैदानाच्या नावाखाली रस्त्यालगत फटाके विक्री स्टॉल परवाने दिले आहेत . एकूणच अपवाद वगळता रहदारीच्या रस्त्यांलगत, नागरी वस्ती मध्ये तसेच मैदानं नसताना देखील बेधडक फटाके विक्री स्टॉलना परवानग्या दिल्या आहेत. 

या मुळे दुर्घटना घडल्यास नागरीकांची मोठय़ा प्रमाणात जिवीत वा वित्त हानी होण्याची शक्यता आहे. फटाके विक्रत्यांना बक्कळ फायदा करुन देण्यासह या मागे काही राजकिय मंडळी देखील गुंतली असल्याचे सूत्रांनी सांगितले . पालिका उपायुक्त डॉ . संभाजी पानपट्टे हे विभाग प्रमुख असून त्यांचाच ह्या बेकायदा फटाके विक्री परवाने देण्यात महत्वाचा हात आहे . या आधी देखील पात्रता नसताना त्यांनी अग्निशमन दलाचे परवाने मोठ्या प्रमाणात दिलेले आहेत . त्यामुळे नागरीकांच्या जीवाशी खेळत बोगस आणि बेकायदा फटाके विक्री परवाने देणाऱ्या पानपट्टे सह संबंधितांना निलंबित करून त्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली चौकशी करण्याची मागणी सत्यकाम फाऊंडेशनचे कृष्णा गुप्ता यांनी केली आहे . 

या प्रकरणी पानपट्टे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद होता . तर आयुक्त डॉ . विजय राठोड यांना फोन केला असता त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही . अग्नीशमन दलाचे प्रभारी प्रकाश बोराडे म्हणाले कि , वरिष्ठांच्या मंजुरी व निर्देशा नुसार परवाने दिले जातात . आपण सर्व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना फटाके स्टॉल ची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे .

टॅग्स :DiwaliदिवाळीMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक