शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय पक्ष, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आयुक्त व निवडणूक अधिकारी निरुत्तर झाल्याने उपस्थित संतप्त

By धीरज परब | Updated: December 22, 2025 21:57 IST

Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या बैठकीत उपस्थितांनी केलेल्यामतदार यादीतील घोटाळा व अन्य  प्रश्नांवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी चक्क निरुत्तर झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले.

- धीरज परबमीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सदस्य यांच्या बैठकीत उपस्थितांनी केलेल्यामतदार यादीतील घोटाळा व अन्य  प्रश्नांवर महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकारी चक्क निरुत्तर झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. उत्तरे दिली जात नसल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त करत जर उत्तरेच द्यायची नव्हती तर बैठक बोलावली कशाला असा सवाल करत उभे राहिले आणि बहिष्कार करत बाहेर पडू लागले. तेव्हा प्रशासनाने विनंती करून थांबवले.

मीरा भाईंदर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकी बाबत उपस्थितांना माहिती देण्यासह त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मीरारोडच्या धर्माधिकारी सभागृहात महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सदस्य यांची जाहीर बैठक बोलावली होती. सादर बैठकीस आयुक्तांसह मीरा भाईंदर पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी, पालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित माजी नगरसेवक रोहित सुवर्णा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ देऊन जर एखाद्या उमेदवाराने शिक्षण आणि गुन्हे संदर्भात माहिती लपवली तर उमेदवारी अर्ज रद्द करण्याचे स्पष्ट आहे. छोट्या चुका दुर्लक्षित करावे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करावे. तसेच आयोगाच्या निकष नुसार उमेदवाराने स्वतःची आणि त्याच्या पती वा पत्नीची आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या अवलंबिताची माहिती देणे बंधनकारक आहे.  जर एखादा अविवाहित तरुण - तरुणी जर उमेदवार असेल व तो त्याच्या आई - वडिलांवर अवलंबून असेल असेल तर त्याने उत्पन्न व मालमत्ता बाबत माहिती कोणाची द्यावी असे प्रश्न केले. मात्र त्यावर महापालिका आयुक्तांसह एकही निवडणूक निर्णय अधिकारी व पालिका अधिकारी यांना उत्तर देता आले नाही. आयुक्त व अधिकारी निरुत्तर झाल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर अनेकांनी सुवर्णा यांच्या प्रश्नावर टाळ्या वाजवल्या.

काँग्रेसचे माजी नगरसेवक अनिल सावंत यांनी मतदार यादीतील महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात केलेल्या गडबडी बद्दल प्रश्न उपस्थित केला. भाईंदर पूर्वेच्या प्रभाग ५ महात्मा ज्योतिबा फुले मार्ग, भाईंदर पश्चिम प्रभाग १ च्या जय अंबे नगर व प्रभाग २३च्या  भोला नगर, प्रभाग ८ मधील व्यंकटेश नगर आणि भाईंदर पूर्व प्रभाग ९ मधील मतदारांची तब्बल ५ हजार ८३५ मतदार  हे मीरारोडच्या शीतल नगर आदी भागातील प्रभाग १९ मध्ये टाकली आहेत. प्रारूप यादी प्रसिद्ध केली तेव्हा सादर मतदार त्यात नव्हते. मात्र अंतिम यादीत हे जाणीवपूर्वक टाकण्यात आले. आम्ही निवडणूक लढवायची कशी ? मतदारांना कसे मतदानासाठी इकडे आणायचे ? मतदान केंद्र निहाय याद्या २७ डिसेम्बर रोजी प्रसिद्ध करणार त्यात जर उमेदवारांचे नाव काढले गेले किंवा दुसऱ्या प्रभागात गेले तर त्याचा मतदार अनुक्रमांक हा बदलून जाईल व जेणे करून त्याचा उमेदवारी अर्ज बाद होईल त्याची जबाबदारी कोण घेणार ? अश्या प्रश्नांची सरबत्ती केली.

निवडणूक आयोगाच्या निर्देश नुसार उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत असे निदर्शनास आले कि, जर एखाद्या प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले असतील तर पदनिर्देशित निवडणूक अधिकारी आहेत त्यांना अधिकार आहेत कि सुधारणा करून पुरवणी यादी प्रसिद्ध करू शकतात. मात्र आम्ही अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांची भेट घेऊन आयोगाचा आदेश निदर्शनास आणून दिला असता त्यांनी आम्ही ह्यात काही करू शकत नाही असे उत्तर देत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे सर्रास उल्लंघन केले आहे असा आरोप यावेळी सावंत यांनी केला. त्यावर आयुक्तांनी हि बैठक मतदार यादीवर चर्चा साठी नाही असे उत्तर दिले.

मतदार यादीतील घोटाळ्या बाबत माजी नगरसेवक राजीव मेहरा, यशपाल सुरेखा, रवींद्र खरात, दीपक बागरी, जय ठाकूर, सचिन पोपळे, रेशमा तपासे, संतोष शिंगाडे, अभिनंदन चव्हाण, दिलीप घाग आदींनी देखील प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या त्यांच्या प्रभागातील मतदार यादी घोटाळ्यांचा पाढाच वाचला. मतदार यादीतील घोळा वरून मतदारांचा विरोध तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण ? ह्या प्रश्नावर देखील उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे उपस्थित अनेकांनी संताप व्यक्त करत सरळ व्यासपीठाजवळ जाऊन जाब विचारला. जर उत्तरे द्यायचीच नव्हती तर बैठक बोलावली कशाला असा सवाल करून बहिष्कार करत बाहेर पडू लागले. त्यावेळी प्रशासनाने त्यांना थांबण्याची विनंती केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Civic meeting uproar: Officials speechless on voter list errors, angering attendees.

Web Summary : Chaos erupted at a Mira Bhaindar election meeting as officials failed to address voter list discrepancies. Angered attendees questioned the meeting's purpose and staged a brief walkout before being persuaded to return.
टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayanderमीरा-भाईंदर