शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर पालिका निवडणूक; भाजप-शिंदेसेनेमध्ये रंगणार खरी चुरस

By धीरज परब | Updated: December 16, 2025 11:52 IST

मराठी टक्का कमी, तर भाजपचा मीरा-भाईंदरमध्ये हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी-गुजराती व जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे.

धीरज परबलोकमत न्यूज नेटवर्क

मीरा रोड : मराठी टक्का कमी, तर भाजपचा मीरा-भाईंदरमध्ये हक्काचा मानला जाणारा उत्तर भारतीय, राजस्थानी-गुजराती व जैन मतदारांचे मोठे प्राबल्य आहे. त्यामुळे भाजपला २०१७ प्रमाणेच यंदाही मीरा-भाईंदर पालिकेवर एकहाती सत्ता आणायची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे मीरा-भाईदरमध्ये भगवा फडकविण्याचे स्वप्न पूर्ण करणार, असा दावा शिंदेसेना करत आहे. यंदा भाजप आणि शिंदेसेनेत प्रामुख्याने चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.आ. नरेंद्र मेहतांनी शिंदेसेनेशी युती करायची, तर भाजपाला ६५, सेनेला १७ व उरलेल्या १३ जागा वाटून घेऊ, असा जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट केला होता. मंत्री सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष स्तरावर बोलणार असे प्रत्युत्तर दिले होते. मीरा-भाईंदरमधील भाजप व शिंदेसेनेच्या रस्सीखेचमध्ये महायुतीतील अजित पवार गट व आरपीआय यांची डाळ भाजप-शिंदेसेना शिजू देतील, ही शक्यता कमीच आहे. काँग्रेसचा मीरारोडमधील ठरावीक पट्टा, तर उद्धवसेना आणि मनसे, शरद पवार गटाचे अल्पबळ पाहता मीरा-भाईंदर पालिकेसाठी महाविकास आघाडी एकत्र येण्याची शक्यता अधिक आहे.

२०१७ चे पक्षीय बलावल - २५ नगरसेवकभाजप - ६१शिवसेना - २२काँग्रेस - १२

सध्याचे पक्षीय बलाबलभाजप - ६५शिंदेसेना - १७काँग्रेस - १०उद्धवसेना - १

शिवसेनेच्या १ माजी नगरसेविका तटस्थ

शिवसेनेच्या एका नगरसेवकाचे कोरोना काळात निधन झाले.

दावे-प्रतिदावे...एकेकाळी मीरा भाईंदर हा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण २०१४ साली मोदी पर्वाने येथील मतदारांचा कल भाजपाकडे वाढला.महापालिकेत २०१७साली चार सदस्य पॅनल पद्धतीच्या निवडणुकीचा फायदा भाजपाला झाला आणि भाजपाचे तब्बल ६१ नगरसेवक निवडून आले. याच पालिकेत यंदा ७० पार असा प्रचार भाजपकडून आ. नरेंद्र मेहता करत आहेत.

पालिकेत शिवसेनेची सत्ता आणणार असे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक सांगताहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira-Bhayandar Municipal Elections: BJP-Shinde Sena Face Off in Key Battle

Web Summary : Mira-Bhayandar's upcoming municipal election is set for a BJP-Shinde Sena showdown. BJP aims to repeat its 2017 victory, while Shinde Sena eyes fulfilling Balasaheb Thackeray's dream. Seat-sharing talks are complex, with potential for a Maha Vikas Aghadi alliance.
टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक