शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

मीरा-भाईंदर महापालिकेची आणखी ३ ऑर्केस्ट्रा बार व १ लॉजवर तोडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 15:37 IST

मीरा भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर तोडक कारवाई सुरु केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -  अनैतिक प्रकार व वेश्या व्यवसाय चालत असलेल्या ऑर्केस्ट्रा बार आणि लॉज वर तोडक कारवाई साठी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर तोडक कारवाई सुरु केली आहे . पालिकेने आणखी ३ ऑर्केस्ट्रा बार व १ लॉजच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे . परंतु नगरसेवक व राजकारणी यांच्याशी संबंधित बार - लॉज वर मात्र ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप होऊ लागला आहे . 

मीरा भाईंदर मधील अनेक ऑर्केस्ट्रा बार व लॉज मधून अनैतिक आणि वेश्या व्यवसाय चालत असल्याचे प्रकार पोलिसांनी केलेल्या अनेक गुन्ह्यां वरून स्पष्ट झाले आहे . पोलिसां कडून महापालिकेस सातत्याने अनतिक व्यवसाय चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज ची यादी देऊन अनधिकृत बांधकामा वर कारवाई करण्याची पत्र सातत्याने दिली जातात . परंतु महापालिका प्रशासना सह काही नगरसेवक - राजकारणी मात्र ह्या अनैतिक व्यवसाय चालणाऱ्या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असतात . कारण स्वतःहून ठोस कारवाई पालिका करत नाही आणि लागेबांधे असलेले नगरसेवक - राजकारणी देखील गप्प असतात . न्यायालयात सुद्धा विधी विभाग प्रभावी बाजू मांडत नाही . 

सतत तक्रारी करून देखील अनैतिक व्यवसाय चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर कारवाई होत नसल्याने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक सह गीता जैन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता . त्या नंतर कुठे पालिकेने अनधिकृत बांधकाम असलेल्या ऑर्केस्ट्रा बार व लॉज वर कारवाई सुरु केली . 

पालिकेने काशीमीरा हद्दीतील महामार्गावर असलेल्या बॉसी , नाईट सिटी व नाईट मिटिंग ह्या ३ ऑर्केस्ट्रा बार वर मंगळवारी तोडक कारवाई केली . यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . परंतु बॉसी बार एका नगरसेवकाशी संबंधित असल्याने नाममात्र कारवाई करण्यात आली . तसेच काही नगरसेवक व पदाधिकारी यांचे अनधिकृत लॉज व ऑर्केस्ट्रा बार ना पालिकेने अजून हात लावला नसल्याचा आरोप होऊ लागला आहे . तर पालिकेचे अधिकारी मात्र कारवाई सुरूच राहणार असून कोणाची गय केली जाणार नसल्याचे दावे करत आहेत. 

सोमवारी पालिकेने चेणे येथील हेरिटेज लॉज च्या तळ मजल्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत खोल्या तोडल्या . गेल्या शुक्रवारी महाजनवाडी भागात असलेल्या रॉकस्टार व मॅडनेस ऑर्केस्ट्रा बार तसेच स्टे इन लॉज हि तळ अधिक एक मजली अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली होती .  

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक