शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मीरा भाईंदरमध्ये आयुक्त रस्त्यावर उतरले; खड्ड्यांवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती

By धीरज परब | Updated: September 21, 2022 11:44 IST

हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या असं आयुक्तांनी म्हटलं.

मीरारोड - मीरा भाईंदर मधील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांप्रकरणी महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांना जातीने लक्ष देऊन योग्य पद्धतीने खड्डे बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर आयुक्तांनी प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. पावसाने लावलेल्या दमदार हजेरीने शहरातील रस्त्यांची चाळणी झाली आहे. शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहतुकीची कोंडी, अपघात आणि शारीरिक जाच नागरिकांना सहन करावे लागत आहेत. मध्यंतरी भरलेले खड्डे पुन्हा पडले असून त्यात टाकलेली खडी - रेती रस्त्यावर पसरली आहे. 

आयुक्त दिलीप ढोले यांनी रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा आढावा घेणारी बैठक घेत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. त्यात शहर अभियंता दिपक खांबित सह उप अभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता आदी बैठकीला हजर होते. पुन्हा जोरात पडणाऱ्या पावसामुळे शहरात खड्डे परिस्थिती निर्माण झाल्याचे आयुक्त यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, उड्डाण पूल ते ते सुभाषचंद्र बोस मैदान, ठाकूर मॉल ते वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर ह्या मुख्यत्वे मार्गावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

हवामान खात्याने यंदाचा पाऊस हा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आतापासून पावसातही शहरातील खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर करून घ्या. खड्डे बुझविताना डांबराची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची ठेवण्या सह अभियंत्याने उभे राहून  कामाची पाहणी करण्याचे व तशी छायाचित्रे वरिष्ठांना सादर करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे . 

आयुक्तांनी वेस्टर्न हॉटेल, हटकेश चौक ते सगणाई माता मंदिर आदी भागातील खड्डे आणि खड्डे बुजवण्याची कामांची पाहणी केली. खड्डे हे कोल्ड मिक्स व जेट पॅचर मशिन वापरुन बुजविणे, रस्त्यावरील दगड, माती हटवुन रस्ते वाहतुकीस सुस्थितीत ठेवणे, रस्त्यावर साचणारे पाणी जाण्यासाठी उपाययोजना करणे जेणेकरुन डांबरावर पाणी साचुन खड्डे पडणार नाहीत आदी सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारास केल्या . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPotholeखड्डे