शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एका नेत्याची मर्जी राखत मीरा-भार्इंदर पालिका अधिका-यांच्या बदल्या ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 22:01 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत.

मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या प्रमुख अधिका-यांच्या बदल्या आयुक्त बालाजी खतगावकर यांनी केल्या आहेत. तर एका आदेशात एका नेत्याची मर्जी जपत बदल्या झाल्याची चर्चा आहे. एका नेत्याची खप्पामर्जी झाल्याने पालिका सेवेतून बाहेर ठेवलेल्या दादासाहेब खेत्रे यांना त्याच नेत्याच्या मर्जीनंतर पुन्हा सेवेत रुजू करून घेत आता महत्त्वाच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण प्रमुख पदासह जाहिरात विभाग दिला आहे. खेत्रेंकडे परवाना व वाहन विभाग होता. त्या पदावर असलेले संजय दोंदे यांना भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती ३ चे प्रभाग अधिकारी नियुक्त केले असून, सोबत परवाना विभाग दिलाय.प्रभाग अधिकारी असलेले गोविंद परब यांना भार्इंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती २मध्ये नेमले आहे. परब हे कामगार सेनेत असल्याने व त्या नेत्याशी संबंधित बांधकामांच्या तक्रारींवर कारवाई करण्यास घेतल्याने त्यांची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. तर दोंदे हे त्या नेत्याच्या मर्जीतले मानले जातात.मीरा रोडच्या प्रभाग ५ चे प्रभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांना प्रभाग समिती ४ मध्ये सुनील यादव यांच्या जागी नेमले आहे. तर यादव यांना बाजार फी वसुली व अभिलेख विभागात पाठवले आहे. प्रभाग समिती १ चे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांना मीरा रोडच्या प्रभाग समिती ५ मध्ये नियुक्त केले असले तरी गोडसे रजेवर असल्यानेच समिती १ चा पदभार परब यांनी तर समिती ५ चा पदभार चंद्रकांत बोरसे यांनी सांभाळायचे आदेश आहेत. प्रभाग समिती २ चे जगदिश भोपतराव यांना वाहन व पे अँड पार्कमध्ये नेमले आहे. आस्थापना अधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांच्याकडे परिवहन उपव्यवस्थापकाचा अतिरिक्त पदभार सोपवला आहे. विजयकुमार म्हसाळ ( उपायुक्त मुख्यालय ) - आयुक्तांच्या आदेशानुसारच बदल्या केल्या असून यात राजकीय हस्तक्षेप नसतो. पालिकेचे काम प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यकतेनुसार बदल्या केल्या आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर