शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात

By जितेंद्र कालेकर | Updated: May 17, 2021 23:21 IST

मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी घडली. या मुलीला सोमवारी तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ठाणे रेल्वे पोलिसांची सतर्कतापालकांनी केली होती रेल्वे मंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी घडली. या मुलीला सोमवारी तिच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्यानंतर थेट रेल्वे मंत्र्यांकडे आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे तिच्या पालकांनी तक्रार केली होती.उत्तरप्रदेशातील बलिया जिल्हयातील महू रेल्वे स्थानक येथून एक १७ वर्षीय मुलगी १५ मे २०२१ रोजी कुठेतरी निघून गेल्याची तक्रार तिच्या पालकांनी स्थानिक पोलीस ठाण्यासह रेल्वे मदत केंद्र तसेच रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. परंतू, ती बेपत्ता झाल्याची तक्रार २४ तासांनी नोंदवून घेण्यात येईल, असेही तिच्या पालकांना सांगण्यात आले होते. तोपर्यंत तिच्या पालकांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली. या मुलीने घरी सोडलेल्या एका पत्राच्या आधारे ती मुंबईत चित्रपटात अ‍ॅक्टींग आणि गाण्याची कला शिकण्यासाठी एका फिल्म अकादामीत प्रवेश घेण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली होती. ती छपरा एक्सपे्रसने १६ मे रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास ठाण्याकडे येणार असल्याची माहिती ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला रेल्वे मदत केंद्रातून दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळाली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलीस निरीक्षक पी. बी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नविन सिंह, सोनाली मलैया आणि हवालदार रोशनी साहू आदींच्या पथकाने दुपारी २.४० वाजता फलाट क्रमांक आठवर आलेली छपरा एक्सप्रेसची कसून तपासणी केली. तेंव्हा महिलांच्या डब्यात ही संशयास्पद मुलगी आढळली. महू रेल्वे स्टेशन येथील तिचे छायाचित्र, पालकांकडून मिळालेले ओळखपत्र आणि सीसीटीव्हीतील फूटेजच्या आधारे तिची ओळख पटविण्यात आली. त्याच आधारे तिच्या पालकांशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क साधण्यात आला. तेंव्हा बेपत्ता झालेली हीच ती मुलगी असल्याची बाब समोर आली. चित्रपटासाठी अभिनय आणि गाणे गाण्याच्या छंदाला कुटूंबीयांनी विरोध दर्शविल्यामुळेच आपण घर सोडल्याचे तिने पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर सांगितले. मुलीच्या आईने संमती दिल्यानंतर मुंबईतील मालाड येथील एका नातेवाईकांकडे तिला रविवारी आरपीएफच्या पथकाने सुपूर्द केले. ठाणे आरपीएफने तत्परता दाखवून या मुलीला वेळीच तिच्या पालकांकडे सुखरुप सुपूर्द केल्याबद्दल या कुटूंबीयांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत. सोमवारी तिच्या नातेवाईकांनी तिला तिच्या आई वडिलांकडे सुपूर्द केले.

टॅग्स :thaneठाणेMissingबेपत्ता होणंMaharashtraमहाराष्ट्र