ठाणे : आठवर्षीय मुलीचा दारूच्या नशेत विनयभंग केल्याच्या आरोपाखाली प्रशांत कासले (४०, रा. सावरकरनगर) या पित्याला वर्तकनगर पोलिसांनी बुधवारी सकाळी अटक केली आहे. मुलीच्या मावशीने या धक्कादायक प्रकाराबद्दल तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पीडित मुलगी जानेवारी २०१८ पूर्वी तिच्या आईवडिलांसमवेत सावरकरनगर येथे वास्तव्याला होती. त्याच काळात तिचे वडील प्रशांत याने दारूच्या नशेत तिच्याशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केल्याचे तिने मावशीला सांगितले. मधल्या काळात तिच्या आईचे निधन झाल्यानंतर ती मावशीकडे वागळे इस्टेट येथे वास्तव्याला आली. त्यावेळी तिने सहा महिन्यांपूर्वी आपल्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. मावशीने याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात १४ आॅगस्ट २०१८ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी त्याला बुधवारी सकाळी ९.३० वाजता अटक केली. उपनिरीक्षक पी.के. भोईर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.आरोपीला रडू कोसळलेदरम्यान, पत्नीचे फेब्रुवारी २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर मुलगी तिच्या मामा आणि मावशीकडे होती. तिचा कायदेशीर ताबा आपल्याकडे मिळावा, यासाठी तिच्या मावशीने ठाणे न्यायालयात दावा केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुलीचा ताबा मिळण्यासाठी कथित आरोपी प्रशांत याने तिच्या मावशीकडे मागणी केली होती. पण, त्यांनी तो देण्यास नकार दिला होता. त्यानंतरच आपल्यावर हे आरोप करण्यात आले. आपल्याच मुलीवर असा प्रकार केला नसल्याचा दावा प्रशांतने पोलिसांकडे केला. त्यानंतर, त्याला रडूही कोसळले. त्याला बुधवारी ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 20:44 IST
आठ वर्षीय मुलीचा पित्यानेच विनयभंग केल्याची तक्रार तिच्या मावशीने दाखल केल्यानंतर प्रशांत कासले याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्यावरील आरोपाचा त्याने मात्र इन्कार केला आहे.
ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्यास अटक
ठळक मुद्दे मावशीने केली तक्रार दाखलवर्तकनगर पोलिसांची कारवाईपित्याचा मात्र इन्कार