शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवून गुजरातमधून तरुणीचे अपहरण: ठाणे पोलिसांनी केली सुखरुप सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 18:18 IST

गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणाऱ्या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

ठळक मुद्देहुजेफा गाडीवाला याला केली अटकगोव्याच्या पणजी शहरातून केली सुटकागुजरातमध्ये होते तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: लग्नाचे अमिष दाखवून गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणा-या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली. त्याच्या ताब्यातून या मुलीची सुटकाही करण्यात आली आहे. या अपहरण नाटयामुळे गुजरातमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, असेही त्यांनी सांगितले.गुजरातमधील वापी जिल्हयातील मालीवाड येथील एका अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याप्रकरणी ७ आॅक्टोंबर २०१८ रोजी व्यारा पोलीस ठाण्यात तिच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. गुजरातमधील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात या मुलीच्याही अपहरणामुळे आणखी भर पडली. विविध राजकीय पक्षांनी आणि काही सामाजिक संघटनांनीही यातील आरोपीच्या अटकेसाठी व्यारा पोलीस ठाण्यावर जोरदार निदर्शने करीत मोर्चेही काढले. व्यारा येथे बंदही पाळण्यात आला. नागरिकांमध्ये मोठया प्रमाणात रोष निर्माण झाल्यामुळे वापीच्या आजूबाजूच्या शहरांमध्येही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या मुलीला मुंबई, ठाणे परिसरात पळवून आणल्याची शक्यता व्यक्त होत होती. व्यारा (गुजरात) पोलिसांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याशी संपर्क साधून याबाबत मदतीची मागणी केली. त्यानुसार ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त दिपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांनी तात्काळ वेगवेगळी पथके वेगवेगळया ठिकाणी पाठविली. ही मुलगी गोवा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, हवालदार आनंदा भिलारे, महिला शिपाई निलम वाकचौरे तसेच व्यारा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. जी. राठोड यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन गोव्यातील पणजी शहरातून या मुलीची सुखरुप सुटका केली. तिचा अपहरणकर्ता हुजेफा यालाही ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. बुधवारी तिला गुजरात पोलिसांच्या मार्फतीने वापी येथे पाठविल्याचेही आयुक्तांनी सांगितले. गुजरात येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठया कौशल्याने सुखरुपरित्या या मुलीची सुटका केल्याबद्दल गुन्हे अन्वेषण विभागाच्या संपूर्ण टीमचेही त्यांनी अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण