शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलाचा वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 21:09 IST

अंबरनाथ येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अखेर ही बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याविरोधात शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्यात आणि देशात महिला तसेच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंबरनाथमध्येही लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एका खासगी शाळेतील ९ वीच्या इयत्तेत शिकणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील दोन अल्पवयीन विद्यार्थी परिसरातील पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित विद्यार्थ्याचा लैंगिक अत्याचार करतानाचा या दोन्ही विद्यार्थ्यांनी व्हिडीओही तयार केला होता. त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धमकावत पैशांची मागणी करत, पैसै न दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घाबरलेला पीडित अल्पवयीन विद्यार्थी या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून घरातून पैसे आणून देत होता.अखेर पैशांसाठी रोज दिल्या जाणा-या धमक्या आणि लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरलेल्या पीडित विद्यार्थ्याने घरात फीनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या विद्यार्थ्याच्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरुणाच्या हाती आल्याने त्याने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. या सर्व घटनेची पीडित मुलाच्या पालकांनाही माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी सर्व अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांची रवनागी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.