शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणारा अल्पवयीन मुलगा जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 8:55 PM

कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देवाहन चोरीचे नऊ गुन्हे उघडबालनिरीक्षणगृहात रवानगीकळवा पोलिसांची कारवाई

ठाणे : मौजमजेसाठी मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या कळव्याच्या शिवाजीनगरातील एका अल्पवयीन चोरट्याला कळवा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मुंबई, ठाण्यातून चोरलेल्या एका रिक्षासह नऊ वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. त्याची भिवंडीच्या बालनिरीक्षणगृहात रवानगी केली आहे.गेल्या काही दिवसांमध्ये मालमत्तेच्या आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये ठाणे शहर आणि कळवा भागात वाढ झाल्याचे निदर्शनास आल्याने ते उघड करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गुन्हे आढावा बैठकीतून अधिकाºयांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिसांकडून नाकाबंदी तसेच गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने नियोजन केले होते. नियमित नाकाबंदीमध्ये पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांनी एका संशयित मोटारसायकलस्वारास थांबवून त्याच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची विचारपूस केली. त्याने समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्याला मोटारसायकलीसह ताब्यात घेतले. तेव्हा, त्याने कळवा आणि मुलुंड परिसरांत अनेक वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यात कळव्यातून तीन, मुंबईतील पाच मोटारसायकली आणि एक रिक्षा अशा वाहनांची चोरी केल्याचे उघड झाले. त्याला बालन्यायमंडळाच्या आदेशानुसार भिवंडीतील बालनिरीक्षणगृहामध्ये जमा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मौजमजा करण्यासाठी तो या वाहनांची चोरी करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्याच्या आणखीही साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी